Saturday, October 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघाचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज — महामंत्री प्रदीप बरडिया

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 16, 2026
in चोपडा, सामाजिक
0
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

चोपडा, दि. १५ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ, मालेगाव यांच्या वतीने चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील गरजू आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान करण्यात आले. संघाचे महामंत्री तथा दातृत्वशील व्यक्तिमत्त्व श्री. प्रदीप मिलापचंद बरडिया यांच्या हस्ते हा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आदिवासी मुलींना कपडे वाटप करतांना मान्यवर

स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली, तरी समाजातील काही घटक आजही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहेत. विशेषतः आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या गरजू विद्यार्थीनींच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

 

 

यावेळी बोलताना महामंत्री प्रदीपभाई बरडिया म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केवळ तिरंग्याला सलाम करून उत्सव साजरा करण्यापेक्षा, शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजातील खऱ्या गरजूंना योग्य वेळी मदतीचा हात मिळाला, तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आवश्यक साधनसामग्री आणि सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पुढे आणणे ही आजची गरज आहे.”

 

 

“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून समाजातील सक्षम व्यक्ती, संस्था आणि दानशूर नागरिकांनी आपल्या परीने गरजूंसाठी योगदान देण्याची भावना जोपासली पाहिजे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना आधार मिळतोच, शिवाय त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळते, असेही प्रदीपभाई बरडिया यांनी सांगितले.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून वसतिगृहातील गरजू आदिवासी विद्यार्थीनींना कपड्यांचे वाटप करण्यात आले. वस्त्रदानाचा लाभ मिळाल्याने विद्यार्थीनींमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थिनींसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी श्री. अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघाचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य डॉ. रामलालजी जैन, सदस्य श्री. संजय चंपालालजी बरडिया, सदस्य श्री. शैलेश पारसमलजी जैन, महाराष्ट्र नवयुवक शाखा कार्यकारिणी सदस्य श्री. नितीन मिलापचंदजी जैन, महाराष्ट्र शाखा नवयुवक कार्यकारिणी सदस्य श्री. आकाश प्रदीपजी जैन, तसेच कमला नेहरू मुलींच्या वसतिगृहाचे अध्यक्ष महेश शिरसाठ, अधीक्षिका कावेरी कोळी यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेच्या माध्यमातून साजरा करत अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघाने गरजू विद्यार्थीनींना दिलेला हा मदतीचा हात समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post Views: 89
Previous Post

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

Next Post

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

Next Post
चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us