Saturday, October 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

आ. चित्राताई वाघ यांचे महिला पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीचे आवाहन; बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्यावर भर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 17, 2026
in चोपडा, राजकीय
0
चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी जळगाव पूर्व विभागाची आढावा बैठक रविवारी (दि. १६) चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महिला संघटनेच्या कामाचा आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीबाबत दिशा निश्चित करण्यात आली.

जळगाव जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका संध्या महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रदेश प्रभारी सविता जैसवाल, प्रदेश सचिव रेखा वर्मा, महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री तथा धुळे महापौर जयश्री कमलाकर अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चित्राताई वाघ यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर महिला पदाधिकारी

बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बूथ, प्रभाग आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थिती, महिला पदाधिकाऱ्यांचा सहभाग, संघटन विस्तार तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. पक्षाच्या विविध महिला-केंद्रित योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला.

‘महिलांपर्यंत योजना पोहोचवा’

मार्गदर्शन करताना चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाचे काम केवळ पदापुरते मर्यादित न ठेवता ते तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

आढावा बैठक समयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्राताई वाघ

महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने संपर्क वाढवून पक्षाच्या विचारधारेसोबत महिलांना जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

संघटन विस्तारावर भर

जयश्री कमलाकर अहिरराव यांनी स्थानिक पातळीवरील सक्रिय सहभागातून संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. रेखा वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देत प्रत्येक स्तरावर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.

 

आ. चित्राताई वाघ यांचे स्वागत करतांना जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन व स्थानिक महिला पदाधिकारी

जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा संध्या महाजन यांनी महिला कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटन मजबूत करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना गती देण्याचे आवाहन केले.

 

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, मंडळ अध्यक्ष कांतीलाल पाटील, नरेंद्र पाटील, पिंटू भाऊ पावरा, गजेंद्रभाऊ जैसवाल, अशोक शिंपी, देवदत्त वैद्य यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आढावा बैठकीस उपस्थित महिलावर्ग

महिला मोर्चाच्या आगामी संघटनात्मक कार्याची दिशा निश्चित करणारी आणि तळागाळातील संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देणारी ही बैठक ठरली.

 

Post Views: 250
Previous Post

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

Next Post

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

Next Post
चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us