Tuesday, September 29, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

श्रावण मासानिमित्त दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात धार्मिक वातावरण; १८८ सेवेकरींचा उत्स्फूर्त सहभाग

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 14, 2026
in चोपडा, संस्कृती
0
बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 : बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित येथे श्रावण मासानिमित्त आज, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला. हे पारायण दि. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

नवनाथ पारायणास बसलेले सेवेकरी

या नवनाथ पारायणासाठी यंदा तब्बल १८८ सेवेकऱ्यांनी पारायणास बसून सेवा स्वीकारली असून, संपूर्ण पारायण काळात हे सेवेकरी नियमितपणे पारायणात सहभागी राहणार आहेत. त्यामुळे पुढील सात दिवस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात भक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

नवनाथ परंपरेला भारतीय अध्यात्मात विशेष महत्त्व आहे. नवनाथांनी समाजाला भक्ती, साधना, आत्मसंयम, सदाचार आणि गुरुभक्तीचा मार्ग दाखविला. नवनाथांच्या पवित्र चरित्राचे वाचन व श्रवण केल्याने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचारांना चालना मिळते आणि आध्यात्मिक साधनेला बळ मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नवनाथ पारायणाच्या काळात “अलख निरंजन! आदेश!” या पारंपरिक जयघोषाने वातावरण भक्तिमय होऊन जाते. नाथसंप्रदायातील या जयघोषातून परमात्म्याचे स्मरण तसेच गुरु-परंपरेप्रती आदर व्यक्त केला जातो. पारायणादरम्यान या जयघोषामुळे सेवेकरी आणि भाविकांमध्ये भक्तिभाव व आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत आहे.

पारायणाच्या कालावधीत सेवेकऱ्यांकडून नियमित वाचन, नामस्मरण, ध्यान, सेवा आणि भक्तीभावाने धार्मिक उपक्रम करण्यात येणार आहेत. सात दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक पर्वामुळे बजरंगनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

नवनाथ पारायणाच्या निमित्ताने परिसरातील स्वामीभक्त व भाविकांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊन नवनाथांचे स्मरण, पारायणाचे श्रवण आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करावी, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील सात दिवस “अलख निरंजन! आदेश!” आणि “श्री स्वामी समर्थ!” या जयघोषांनी बजरंगनगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

Post Views: 252
Previous Post

चोपडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात रक्षित महाजन प्रथम

Next Post

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post
चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us