Tuesday, November 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

१५ हजारांची मागणी, १० हजारांची लाच स्वीकारताना कारवाई; पिंप्री खुर्द येथील रस्त्याच्या बिलासाठी लाचेची मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
in जळगांळ जिल्हा, ब्रेकींग न्युज
0
जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव |

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) मोठी कारवाई केली. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पुढील मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता अशा दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेसनोटनुसार, सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५, उपविभागीय अधिकारी, बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद जळगाव) आणि भागवत वसंत चवरे (वय ३२, कनिष्ठ अभियंता, बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद जळगाव) अशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे आहेत.         

या प्रकरणातील तक्रारदार हे ४२ वर्षीय कंत्राटदार असून त्यांनी सन २०२५-२६ मध्ये पिंप्री खुर्द, ता. धरणगाव येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे ९ लाख ९० हजार ७६३ रुपयांचे काम केले होते. सदर काम पूर्ण झाल्यानंतर कामाची मोजणी पुस्तिका व बिल तयार करण्यासाठी स्थापत्य अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर तक्रारदाराने कामाचे बिल मंजूर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडे संपर्क साधला. यावेळी आरोपी क्रमांक २ भागवत चवरे यांनी कामाच्या बिलावर सही करून ते पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषद जळगाव येथे पाठविण्याकरिता आरोपी क्रमांक १ सतीश शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ नोव्हेंबर रोजी पडताळणी करून सापळा रचला. यावेळी आरोपी क्रमांक २ भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारले व ही रक्कम आरोपी क्रमांक १ सतीश शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनीही सदर रक्कम स्वीकारून स्वतःकडे ठेवली. त्यानंतर ही लाचेची रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

या कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक १ यांच्या अंगझडतीत अ‍ॅपल कंपनीचा एक मोबाईल व ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम, तर आरोपी क्रमांक २ यांच्या अंगझडतीत विवो कंपनीचा एक मोबाईल व २० हजार ६०० रुपये रोख रक्कम मिळून आली.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ , १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांचे पर्यवेक्षण होते. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळू मराठे व संगीता पवार यांचा सहभाग होता.

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views: 101
Previous Post

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us