Thursday, October 22, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

चोपडा शहर पोलिसांच्या गणेश मंडळांना सूचना; CCTVसह नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
in ठळक बातमी, चोपडा, शासकीय
0
गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 – आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांनी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत घेणे बंधनकारक असून, विनापरवानगी गणेशमूर्तीची स्थापना अथवा उत्सव साजरा केल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, सार्वजनिक गणेश मंडळांनी नगरपरिषद/ग्रामपंचायत, धर्मादाय आयुक्त, महावितरण तसेच खासगी जागेवर मंडप उभारण्यात येत असल्यास जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आदी आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑनलाइन परवानगी फॉर्म भरावा. संबंधित परवानगी फॉर्म चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे जमा करावा.

दोन दिवसांत कायदेशीर परवानगी घेण्याचे आवाहन

पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, काही गणेश मंडळांनी आतापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशनकडून अधिकृत परवानगी घेतलेली आहे. मात्र, उर्वरित मंडळांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर, म्हणजे दोन दिवसांत पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कायदेशीर परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उशीर झाल्यास परवानगी देता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

विनापरवानगी मंडप उभारल्यास कारवाई

ज्या गणेश मंडळांनी अद्याप चोपडा शहर पोलीस स्टेशनची रीतसर परवानगी घेतलेली नाही, अशा मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना किंवा उत्सव साजरा केल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थित वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि आवश्यक परवानगी तातडीने मिळवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळांच्या परिसरात CCTV बंधनकारक

गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर मंडळाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी CCTV कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

विसर्जनाबाबतही पोलिसांचा स्पष्ट इशारा

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या रात्री कोणत्याही गणेश मंडळाने श्री गणेशाची मूर्ती चोपडा शहरातील सार्वजनिक ठिकाणी ठेवू नये. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मूर्ती लाईनमध्ये लावण्यासाठी आणावी. तसेच मिरवणूक संपल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गणेशमूर्ती उभी करू नये. या नियमांचे उल्लंघन करून काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकारिणीला जबाबदार धरून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

नगरपरिषदेच्या अटींचे पालन आवश्यक

नगरपरिषद चोपडा यांच्याकडून परवानगी देताना घालून देण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे. अटी व शर्तींचे पालन केले नसल्यास संबंधित गणेश मंडळाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी मांडली आहे.

Views: 479
Previous Post

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

Next Post

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Next Post
कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us