लोकप्रवाह, चोपडा दि. २१ जाने.(संदिप ओली) – बारामती ऍग्रो लिमिटेड आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता मकरसंक्रांती निमित्त ‘हळदी कुंकू’, ‘महिला सुसंवाद’ व ‘युवतींसाठी हेल्थ अँड हायजिन’ आदी विषयीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन अॕग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालक सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी त्या ‘महिला सबलीकरण आणि गृह उद्योग’ या विषयांवर महिला भगिनींशी संवाद साधणार आहेत.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशा विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील व अकलूज येथील सावी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. सविता रणजीत व्होरा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी चोपडा परिसरातील महिला, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अॕड.संदीप सुरेश पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी केले आहे.








