Sunday, April 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अडावदला बनावट आयोडेक्स आणि झेंडू बाम विकणाऱ्यास अटक

२० हजार ९०० च्या नकली मालासह संशयितास अटक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 12, 2023
in क्राईम
0
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, अडावद, चोपडा दि. १२ फेब्रु.  – येथील मेडीकल दुकानांवर आयोडेक्स आणि झेंडूबामच्या हुबेहूब बनावट बाटल्याची विक्री करण्याऱ्या भामाट्यास औषधी दुकानदारांच्या सजगतेने अटकाव करण्यात आला असुन त्याच्या ताब्यातील २० हजार ९०० रूपयांचे बनावट औषधी वस्तू खरे असल्याचे भासवून ग्राहक व सबंधित कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक करून फसवणूकीसह सुधारित प्रतीलीपी अधिनियमन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडावद येथील एका मेडीकल स्टोअर्स दुकानात दि. १० रोजी सायंकाळी संशयित मनिष चतुर्भुज बजाज वय ४५ रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण जळगाव हा इमामी लिमिटेड पंश्चिम बंगाल कंपनीचे आयोडेक्स आणि झेंडूबाम च्या बाटल्याची विक्री करण्यासाठी आला. यावेळी किंमतीच्या तफावतीमुळे तसेच हुबेहूब दिसणाऱ्या बाटल्याविषयी मेडीकल चालकास संशय आला. त्यांनी हि बाब एका पोलिसास कळविल्यानंतर सदर भामट्यास पोलिस स्टेशनला घेऊन आल्यावर नकली मालाचे बिंग फुटले. सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश बुवा यांनी जळगाव येथील अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांना घटनेची खातरजमा करण्यासाठी पाचारण करून घेतले. सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल माधवराव माणिकराव आणि औषध निरिक्षक सोमनाथ मुळे यांनी सदर इसमाजवळील आयोडेक्स व झेंडूबामची खातरजमा केली असता रंग, वास तसेच लावलेल्या बारकोड मध्ये विसंगती आढळून आल्याने संशयित भामट्याच्या ताब्यातील इमामी लि. पश्चिम बंगाल, कोलकाता कंपनीचे झेंडूबाम एकूण नग २५० तसेच मँक्सन हेल्थ केअर प्रा.ली. कंपनीचे आयोडेक्स ३० नग असा २० हजार ९०० रूपयाचा बनावट माल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी अडावद पोलीस स्थानकात डॉ. अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीवरुन संशयित मनिष चतुर्भुज बजाज याच्या विरोधात भाग ५ गुरनं. १८/२३ भादंवि ४२०, ४६५, ४६८, २७४ या कलमांसह सुधारीत अन्न भेसळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि. गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Post Views: 445
Previous Post

चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 

Next Post

चोपडेकरांसाठी आनंदाची बातमी…! आता चार दिवसांआड मिळणार पिण्याचे पाणी!!

Next Post
ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार 

चोपडेकरांसाठी आनंदाची बातमी...! आता चार दिवसांआड मिळणार पिण्याचे पाणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us