Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 

उर्वरित ६ जण सुखरुप

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 3, 2023
in ब्रेकींग न्युज
0
चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ११ फेब्रु. (संदिप ओली) : शहरातील बाजारपेठेतील मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाचा मृत्यु झाला व उर्वरित 6 जणांना या भीषण आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मयत गौरव सुरेश राखेचा(जैन)
आग लागली असतांनाचे छायाचित्र
चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री  १ ते 0१.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे समजताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले. नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा त्याठिकाणी पोहोचली. ते दाखल झाल्यावर त्यांच्याकडून आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पोलीसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या. त्यानंतर तब्बल साडे चार तासांनी हि आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा(जैन) वय २७ या तरुणाचा मृत्यु झाला. व उर्वरित 6 जणांना आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचावकार्य करतांना नगरपालिकेचे तीन कर्मचारी जखमी झालेत. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी अजित सावळे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, नितिन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले. त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. यावेळी चोपडा शहर पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरवासियांनी सुद्धा यावेळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रविण जैन, पत्रकार लतीष जैन, सचिन सोनवणे, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, शिवा पाटील आदिंसह इतर शहरवासियांनी बचावकार्यात मदत केली.
Post Views: 10,553
Previous Post

चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !

Next Post

अडावदला बनावट आयोडेक्स आणि झेंडू बाम विकणाऱ्यास अटक

Next Post
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

अडावदला बनावट आयोडेक्स आणि झेंडू बाम विकणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us