Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील ८० किमी चे रस्ते जिप कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

आमदार लताताई सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 1, 2023
in जिल्हा, ठळक बातमी, तालुका विशेष
0
चोपडा तालुक्यातील ८० किमी चे रस्ते जिप कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा ३१ मार्च : तालुक्यातील जवळपास १०५ किमी चे रस्ते जिल्हापरिषद कडे होते, त्यावर शासनाकडून निधी मिळत नव्हता. यासाठी आमदार लताताई सोनवणे यांनी प्रयत्न करून यातील ८० किमी चे रस्ते जिल्हा परिषद विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले असून लवकरच त्यावर निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार लताताई सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मंगला पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लताताई सोनवणे म्हणाल्या की, जिल्हा परिषद विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झालेले ८० किमी चे रस्ते यात धनवाडी ते कठोरा – ११ किमी, वर्डी ते मंगरूळ फाटा- १६ किमी, कुसूंबा – मोहिदा फाटा – अजंतीसिम – वढोदा – विटनेर – वाळकी – अनवर्दे – घाडवेल ३१ किमी, घाडवेल ते वाळकी रस्ता १२.५० किमी, गणपूर ते मराठे ते लासुर रस्ता १० किमी असे एकूण ८१ किमी चे रस्ते वर्ग करण्यात आले आहेत. तसेच मागील अर्थसंकल्पात २५ कोटी व आताच्या अर्थसंकल्पात २५ कोटी असे एकुण ५० कोटी रुपयांचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी मंजूर झाला आहे. सदर कामेही लवकर सुरू होणार आहेत. तालुक्यातील उनपदेव व मनुदेवी या पर्यटन स्थळांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून चांदसणी – कमळगांव येथील कालभैरव मंदिराच्या सभामंडपासाठी ५० लाख रुपयांचा निधी  मिळाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Post Views: 1,366
Previous Post

चोपडा येथे “आशा दिवस” उत्साहात साजरा 

Next Post

वसुंधरेचे संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य : पोलीस निरीक्षक के.के. पाटील

Next Post
वसुंधरेचे संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य : पोलीस निरीक्षक के.के. पाटील

वसुंधरेचे संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य : पोलीस निरीक्षक के.के. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us