Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे “आशा दिवस” उत्साहात साजरा 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 31, 2023
in तालुका विशेष, आरोग्य
0
चोपडा येथे “आशा दिवस” उत्साहात साजरा 
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० मार्च – आशा स्वयंसेविका म्हणजेच आशा वर्कर्स या आरोग्य विभाग व सर्वसामान्य नागरिक यांच्यामधील महत्वाचा दुवा मानल्या जातात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आरोग्य विभागात उल्लेखनीय आरोग्यसेवा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक व्हावे त्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरीता दि. ३० मार्च २०२३ रोजी शहरातील नगरपालिका नाट्यगृह येथे आरोग्य विभागाच्या वतीने “आशा दिवस” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लताताई सोनवणे, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे व शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मंगला पाटील आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून गायत्री जोशी यांना सन्मानित करतांना आमदार लताताई सोनवणे, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, डॉ. प्रदिप लासुरकर व इतर…
कोविड-१९ सारख्या भीषण परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आशा स्वंयसेविकांनी घरोघरी जावून जनजागृतीचे व आरोग्यसेवा बजाविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली, असे गौरवोद्गार यावेळी आमदार लताताई सोनवणे यांनी आपल्या भाषणातून काढले.
यावेळी सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून छाया नितीन माळी अडावद, मीनाक्षी प्रवीणकुमार सोनवणे चहार्डी, सुरेखा दिलीप महाजन धानोरा, शीतल शरद पाटील गोरगांवले बु., उषाबाई जगन्नाथ सोनवणे हातेड बु., दिपाली सुनील ढिवरे लासुर, संगीता पंडित पाटील वैजापूर, गायत्री विलास जोशी चोपडा शहर व सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून ललिता शिरसाठ, प्रा. आ. केंद्र, चहार्डी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चोपडा तालुका आरोग्य विभागाअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण २४१ आशा स्वयंसेविका व १४ गटप्रवर्तक आपली सेवा बजावितात.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी केले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा व कवितावाचन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आल्या. आशांना त्यांचे दैनंदिन काम करतांना येणारे ताणतणाव दूर ठेवणेसाठी मानसोपचार समुपदेशक अजित बाविस्कर यांनी समुपदेशन सत्रात मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र पवार, डॉ. दिनेश निळे, डॉ. वसंत जाधव, डॉ. नकुल पाटील, डॉ. मयूर पाटील, डॉ. विवेक जयस्वाल उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र महाजन यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. योगेंद्र पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश बाविस्कर, जितेंद्र मोरे, राजू पाटील, प्रमोद पाटील, दिलबरसिंग वळवी, कमलेश बडगुजर, किशोर सैंदाणे, राजु पवार, गजानन करंदीकर, चेतन धामोणे, निलेश सपकाळे, तालुका समूह संघटक सागर शिंपी, ललिता परदेशी, जयश्री तायडे व ज्योती सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.
Post Views: 3,651
Previous Post

अधिकाधिक महिलांचा सन्मान होणे हेच दर्पण पुरस्काराचे यश : सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित 

Next Post

चोपडा तालुक्यातील ८० किमी चे रस्ते जिप कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

Next Post
चोपडा तालुक्यातील ८० किमी चे रस्ते जिप कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

चोपडा तालुक्यातील ८० किमी चे रस्ते जिप कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us