Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस शिक्षा

पोक्सो कायद्यांतर्गत अमळनेर सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 4, 2023
in क्राईम, पोलीस डायरी
0
अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस शिक्षा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, दि. ०३ मे, चोपडा : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने पोक्सो व इतर विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे. दिपक रविन्द्र भिल रा. अकुलखेडा ता.चोपडा जि. जळगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
           सदर घटनेप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला गुरन. 25/20 भादंवि. 363 नुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दिपक रविंद्र भिल हा दि. 17 फेब्रुवारी रोजी देवळाली ता. करमाळा जि. सोलापूर येथे पोलिसांना पिडीत मुलीसोबत मिळून आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध या गुन्हयात भादंवि. 376 (1) (ए), 376 (3) सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. व आरोपी दिपक भिल यास अटक करण्यात आली होती.
तपासाधिकारी तत्कालीन पोउनि. रामेश्वर तुरनार
                         सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी पुर्ण करुन आरोपीविरुध्द अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तपासातील सबळ पुरावे उपलब्ध करुन मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपी दिपक रविंद्र भिल यास मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी, अमळनेर यांनी भादंवी कलम 363 अन्वये 7 वर्ष कैद, पोक्सो कलम 4 मध्ये 20 वर्ष कैद, पोक्सो कलम 8 मध्ये 3 वर्ष कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांना पोहेकॉ प्रदीप राजपुत, पोना. जयदिप राजपुत, पोना. मधुकर पवार आदींनी मदत केली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॕड. एस.आर. पाटील यांनी कामकाज पाहिले तर पोकाॕ. नितिन कापडणे यांनी केसवॉच म्हणून काम पाहीले.
Post Views: 1,098
Previous Post

चोपड्यातील त्या दोन अनाधिकृत शाळा बंद ..!

Next Post

कठोरा गावातील गरजू कामगारांना मिळणार मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ !!

Next Post
कठोरा गावातील गरजू कामगारांना मिळणार मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ !!

कठोरा गावातील गरजू कामगारांना मिळणार मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us