Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार !!; लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2023
in चोपडा, ठळक बातमी
0
चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार !!; लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० : तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवकाची नेमणूक तसेच दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा यासाठी आपचे कार्यकर्ते व दिव्यांग बंधू यांचे तब्बल 20 दिवसांपासून गावातील महादेव मंदिरात साखळी उपोषण सुरु होते. या कालावधी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन वेळा निवेदन देण्यात आले. याची दखल घेत येत्या दोन दिवसात नवीन ग्रामसेवक रूजू करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले आहे.
चोपडा तालुक्यातील नंबर २ ची लोकसंख्या असलेली चहार्डी ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज पुर्णवेळ होत नाही, ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरु असून नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाही. ज्यामध्ये उतारे व दाखले वेळेवर न मिळणे, गावातं स्वच्छता व साफसफाई न होणे, गटारी व सार्वजनीक शौचालयांची सफाई होत नसून मैला उघडयावर वाहून नदीत जातो त्यामुळे पाणी दुषीत होवून नागरिकांच्या आरोग्य व गावातील पशुधन यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे तसेच गावातील कुपनलिकेच्या पाण्याचा रिपोर्टपण दुषीत आला असुनही कोणतीही कार्यवाही न करणे व दुषीत पाण्याचा पुरवठा होणे आदी बाबींचा समावेश आहे.
सदर साखळी उपोषणास प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ( महाराष्ट्र राज्य ) ने आपला जाहीर पाठिंबा देत जो पर्यंत दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी मिळणार नाही तो पर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
    तसेच दिव्यांग बंधु-भगिनींना दिव्यांग निधी मिळाला नसून त्यापासुन ते वंचित आहेत. या सर्व सुविधांसाठी चहार्डी ग्रामपंचायतीला पुर्णवेळ व निवासी ग्रामसेवकाची नेमणूक व्हावी जेणेकरुन नागरिकांची कामे वेळेवर होतील. यासाठी आम आदमी पक्षाचे तालुका उपसंयोजक मुकुंदराव पाटील व गावातील दिव्यांग बंधू ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून साखळी उपोषणास बसले होते. आज २० व्या  दिवशी लेखी आश्वासन नंतर साखळी उपोषण सोडण्यात आले.
    यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील (रावेर), रविंद्र पाटील ( खडगाव ), प्रहार तालुकाध्यक्ष भगवान वैदू, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी, योगेश हिवरकर, योगेश भोई, जिल्हा उप संयोजक विठ्ठल साळुंखे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष आर. डी. पाटील, तालुका संयोजक समाधान बाविस्कर, शहर संयोजक सुधीर पाटील, सिताराम वसंत पाटील, दिपक भाईदास पाटील, प्रकाश रघुनाथ सोनवणे, गोविंद लालचंद कोळी, अनिल मधुकर महाजन, जेष्ठ नागरिक भगवान रतन वाणी यांसह दिव्यांग बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 412
Previous Post

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

Next Post

चोपडा महाविद्यालयात सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post
चोपडा महाविद्यालयात सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us