Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ग.स. संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना सन्मान निधीचे वितरण

११० जेष्ठ सभासदांना सन्माननिधी धनादेशाचे वितरण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 10, 2023
in चोपडा, सहकार
0
ग.स. संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना सन्मान निधीचे वितरण
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेच्या ज्येष्ठ सभासद सन्मान निधी योजनेअंतर्गत चोपडा नं. १ ते ५ शाखेतर्फे सभासद होऊन २५ व ३० वर्षे झालेल्या एकुण ११० जेष्ठ सभासदांना अनुक्रमे रू. ५००१ व ७००१ चे सन्माननिधीचे धनादेश वितरण करण्यात आले. शहरातील मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, माजी गटविकास अधिकारी हिराबाई जाधव, जळगाव माध्यमिक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आर. एच. बाविस्कर, माजी मुख्याध्यापक मधुकर बाविस्कर, माजी संचालक देवेंद्र पाटील, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, विद्यमान संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, चोपडा कॉलेजचे प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकात संचालक योगेश सनेर यांनी संस्थेच्या विविध योजनांबद्दलची विस्तृत माहिती दिली. तसेच केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सुनील चौधरी, जगदीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या ध्येय-धोरणांबाबत गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ग.स.च्या ज्येष्ठ सभासदांची विशेष उपस्थिती होती.
        सूत्रसंचलन विवेकानंद विद्यालयाचे उपशिक्षक राधे:श्याम पाटील तर आभारप्रदर्शन कै. हि. मो. करोडपती विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश भोईटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी, शाखाधिकारी यांचेसह सर्वच कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 519
Previous Post

पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक मुक्त अभियान

Next Post

पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

Next Post
पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us