Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

विविध सामाजिक उपक्रमासह साजरा झाला वाढदिवस

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 12, 2023
in तालुका विशेष, महाराष्ट्र, सामाजिक
0
पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १२ : येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला . वाढदिवस निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .

संस्थेतील मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास प्लॕटची चावी देतांना पंकजभैय्या बोरोले व डॉ. सुरेशदादा बोरोले.

कर्तृत्व आणि दातृत्वाचा अनोखा संगम म्हणजे पंकज बोरोले ! संस्थेतील कर्मचारी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. निधनापूर्वी त्यांनी स्वतःचे घर असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण स्वतःचे घर असावे ही त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आज आपल्या वाढदिवशी पंकज बोरोले यांनी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांच्या पत्नी रुपाली अत्तरदे यांना १५ लाख रुपये किमतीच्या फ्लॅटची चावी देत फ्लॅट बक्षीस स्वरूपात देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. तसेच रुपाली अत्तरदे यांना पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू करून घेतले. सदर प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले. राजेंद्र अत्तरदे यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

पंकजभैय्या बोरोले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना पंकज गृप व मित्रपरिवार

पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वतः पंकज बोरोले व दिपाली बोरोले यांनी रक्तदान केले. ९६ रक्तदात्यांनी नोंदणीकरण केले. सदर कार्यक्रम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय के. पाटील, डाॅ. नंदिनी वाघ व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. अजय पाटील, प्रा. दिपक देवरे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्त केंद्राचे सुनील माळी, किरण लोहार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

श्री. पंकजभैय्या बोरोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना लोकप्रवाह न्युज चे मुख्य संपादक संदिप ओली…

त्याचप्रमाणे दि. ६ ते ११ डिसेंबर दरम्यान पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . त्यात १६ संघ सहभागी झाले होते. दि. ११ डिसेंबर रोजी प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यासाठी एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि. १३ डिसेंबर रोजी सायं.६ वाजता प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्तृत्व आणि दातृत्व याचे धनी असणारे पंकजभैय्या बोरोले यांच्यासारखे व्यक्तिमत्व क्वचितच बघायला मिळतात. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला तो व्यक्ती नसल्यावर सुद्धा त्याची इच्छा पुर्ण केली. यातच तुम्ही आज सगळ जिंकुन घेतल.. भैयासाहेब आपण नगराध्यक्ष व्हा, आमदार व्हा कारण तुमच्याकडे सर्वप्रकारच्या शक्ती आहेत, पात्रता आहे. आणि विशेषः म्हणजे वडिलांची साथ आहे. भैयासाहेब आपणास वाढदिवसाच्या  खुपखुप शुभेच्छा !!

–लोकप्रवाह–

 

Post Views: 1,152
Previous Post

ग.स. संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना सन्मान निधीचे वितरण

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us