Tuesday, April 28, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कबचौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एकांकिका करंडक स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाची विजयाची हॅट्रिक!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 6, 2024
in जळगांळ जिल्हा, शिक्षण
0
कबचौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एकांकिका करंडक स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाची विजयाची हॅट्रिक!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील एकांकिका टीमने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे आयोजीत एकांकिका करंडक २०२३ स्पर्धेत ‘पडदा‘ एकांकिका सादर करीत सलग तिसऱ्या वर्षी दमदार विजय संपादन करून विजयाची हॅट्रिक संपादन केली आहे. त्यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी कलावंत विद्यार्थी व संघ प्रमुख डॉ. हरेश गंभीर चौधरी तसेच दिग्दर्शक मकरंद चौधरी यांनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डाॅ. स्मिता पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच सदिच्छा व्यक्त केल्या.
          या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी व दिग्दर्शक मकरंद चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी केले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच संघप्रमुख व दिग्दर्शक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एकांकिका करंडक स्पर्धा २०२३’ या स्पर्धेतील सर्वच प्रकारांमध्ये चोपडा एकांकिका समूहाने सलग तिसऱ्या वर्षी  ‘पडदा’ ही एकांकिका सादर करीत विजयाची परंपरा कायम राखून भरघोस पारितोषिके प्राप्त केली. यामध्ये ‘पडदा’ एकांकिकेला सांघिक प्रथम एकांकिकेचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच  हर्षल संजय पाटील या विद्यार्थ्याला संगीत योजनेचे प्रथम, पूनम भगवान बडगुजर या विद्यार्थिनीला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, निलेश प्रकाश माळी व योगेश राजेश चित्रकथी या विद्यार्थ्याला प्रकाश योजनेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, रचना नंदकिशोर अहिरराव या विद्यार्थिनीला अभिनय स्त्री प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, हर्षल रघुनाथ निकम या विद्यार्थ्याला उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर तेजल राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीने उत्कृष्ट अभिनय सादर करीत अभिनय नैपुण्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सागर खैरनार, कुणाल रुकमे, शितल पाटील, छाया चित्ते, कोमल पाटील, कोमल भदाणे, पुरुषोत्तम पाटील, दिपेश शुक्ल, कुलभूषण दोडे या विद्यार्थ्यांनी बॅकस्टेज म्हणून भूमिका साकारली याआधी देखील उमवि करंडक स्पर्धेत ‘रंगबावरी’ व ‘म्याडम’ एकांकिकांनी अशीच दमदार कामगिरी व यश संपादन केल्याने हॅट्रिक साध्य करता आली, असे मत संघ प्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्पर्धेबाबतचे अनुभव कथन केले.
  यावेळी उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. तसेच स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी म्हणाले की, स्पर्धक विद्यार्थ्यांनी नियमित जिद्द, चिकाटी व अफाट कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणतीही स्पर्धा जिंकण्याचे बळ आपोआपच प्राप्त होते. म्हणून प्रत्येक स्पर्धा विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून देते त्या संधीचे सोने करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावी. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
Post Views: 398
Previous Post

६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !

Next Post

चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!

Next Post
चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!

चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us