Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर – गजेंद्र पाटोळे

क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 24, 2024
in जळगांळ जिल्हा, चोपडा, शासकीय
0
होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर – गजेंद्र पाटोळे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २४ – 85 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांसाठीच होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा उमेदवारांची भेट घ्यावी. होम वोटिंग करताना उमेदवाराच्या घरी स्वतंत्र मतदार कक्ष उभारावा. होम वोटिंग करताना तेथे व्हिडिओ कॅमेरा नेऊन मतदान करतानाचे चित्रीकरण करावे. होम वोटिंगसाठी लवकरच गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल त्यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे व सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते.
आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे
          क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मंडप उभारावेत. मतदान केंद्रांवर पाळणाघराची सोय करण्यात यावी. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एनसीसी कॅडेट्स यांची मदत घेऊन आवश्यक त्या मूलभूत सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले तर योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आले.
Post Views: 305
Previous Post

उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा – संदिपन खान

Next Post

वर्धा येथे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली संपन्न

Next Post
वर्धा येथे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली संपन्न

वर्धा येथे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us