Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे कृषी दिनानिमित्त ..कृषी दिंडी..!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 1, 2025
in चोपडा, शेती विषयक
0
चोपडा येथे कृषी दिनानिमित्त ..कृषी दिंडी..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 जुलै :– हरीत क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री (कै.)वसंतराव नाईक यांची जयंती ” दिनी १ जुलै सकाळी ८ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात “कृषीदिन साजरा करण्यात आला.
कृषी दिनानिम्मित जमलेले सर्व शेतकरी बांधव व मान्यवर मंडळी
   शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि समृद्धीचा सन्मान करण्यासाठी तसंच शेतकरी समुदायाच्या अखंड परिश्रमाला वाहिलेल्या शेतकऱ्यांचा हा सन्मान दिवस
 ‘कृषी दिना’च्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रथम (कै.)वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातून कृषी दिंडी वाजत गाजत काढण्यात आली. या दिंडीत शेतकरी, कृषी तज्ज्ञ, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला
“शेती ही आपली जीवनरेषा” या संदेशासह, शेतसाहित्य व नैसर्गिक शेतीचे मॉडेल्स घेऊन दिंडी निघाली. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मधून सकाळी साडेआठ वाजता निघालेल्या या कृषी दिंडीला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. पेरणीची पांभर, औत, बैलगाडी जोडी, विविध कृषी अवजारे, फवारणी पंप आदी साहित्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी सजवून आणले होते. कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत सादर केले. शेतकऱ्यांनी आपापल्या पारंपरिक पोषाखात सहभाग घेऊन कृषी संस्कृतीचे दर्शन घडवले. जय जवान जय किसान चा नारा देत दिंडी काढण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उद्योजक वसंतभाई गुजराथी, डॉ.रवींद्र निकम, आडगाव येथील शेतकरी अंबादास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ऍड. घनश्याम पाटील, संचालक नंदकिशोर पाटील, शेतकरी नेते एस बी पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक, जिल्हा कृषी अधिकारी तडवी, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे श्रीराम तेले, कवी रमेश पाटील, आडगाव चे माजी सरपंच रावसाहेब पाटील, हुकुमचंद पाटील, प्रकाश पाटील (बिडगाव) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Post Views: 699
Previous Post

जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान 

Next Post

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next Post
रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us