Wednesday, September 30, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

३६ वर्षे ८ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेला भावपूर्ण निरोप

ग.स.चे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 6, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, सहकार
0
३६ वर्षे ८ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेला भावपूर्ण निरोप

टिम लोकप्रवाह, चोपडा : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था अर्थात ग.स. सोसायटीचे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) यांनी तब्बल ३६ वर्षे ८ महिने १४ दिवसांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेला गौरवपूर्ण निरोप देण्यासाठी चोपडा ग.स. विभागाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान संचालक योगेश सनेर, मंगेश भोईटे, एकनाथ पाटील तसेच माजी विभागीय अधिकारी किरण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विभागीय अधिकारी अशोक पाटील यांनी केले.

ग.स. सोसायटीचे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांच्या सेवापूर्ती निमित्त चोपडा ग.स. विभागाच्या वतीने सपत्नीक सत्कार करताना मान्यवर.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, कार्यकुशलता आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीचे कौतुक केले. संस्थेच्या कामकाजात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.

थकबाकी वसुलीसाठी विशेष योगदान

शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना थकबाकीदार सभासदांकडील सव्वा कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत रक्कम वसुलीसाठी जगन्नाथ बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना जगन्नाथ बाविस्कर यांनी सर्वप्रथम सहकारमहर्षी स्व. बी. बी. आबा पाटील तसेच मायबाप ग.स. संस्थेचे ऋण व्यक्त केले. संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या दिवंगत नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांचे स्मरण करून त्यांनी विद्यमान नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे आभार मानले. भडगाव, अमळनेर, यावल, एरंडोल आणि चोपडा येथे सेवा बजावत असताना त्या-त्या ठिकाणचे सभासद, अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास चोसाका संचालक अनिल पाटील, डॉ. मोहन पाटील, देविदास पाटील, प्रेमनाथ बाविस्कर, श्रीमती जावित्रीबाई बाविस्कर, सौ. आशाबाई बाविस्कर, वैभवराज बाविस्कर, सौ. दिपाली बाविस्कर, तसेच चोपडा ग.स.चे विभागीय अधिकारी दिलीप सपकाळे, शाखाधिकारी शितल मोरे, स्मिता मोरे, शरद पाटील, प्रविण सत्तेसा, चेतन सोनवणे यांच्यासह सर्व उपशाखाधिकारी, रोखपाल, लिपिक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.स. विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोखपाल उज्वल शिंदे यांनी केले.

Post Views: 149
Previous Post

BHMS-CCMP डॉक्टरांच्या नोंदणीच्या प्रस्तावाला विरोध; चोपडा IMAसह विविध वैद्यकीय संघटनांचा २४ तासांचा निषेध

Next Post

धुळे येथे श्री संजीव बैसाणे यांचा दुहेरी गौरव; उद्योग रत्न पुरस्कारासह चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us