Tuesday, September 29, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धुळे येथे श्री संजीव बैसाणे यांचा दुहेरी गौरव; उद्योग रत्न पुरस्कारासह चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 10, 2026
in चोपडा, सामाजिक
0
धुळे येथे श्री संजीव बैसाणे यांचा दुहेरी गौरव; उद्योग रत्न पुरस्कारासह चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 10 : राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने २ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवा, उद्योग, शिक्षण, प्रशासन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

इंजि. संजीव बैसाने यांचा गौरव करतांना मान्यवर

या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील बांधकाम व्यावसायिक तथा वास्तुनिर्मिती फर्मचे मालक श्री. संजीव गंगाधर बैसाणे यांना बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच सामाजिक कार्यातील सहभागाची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘उद्योजक रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात श्री. संजीव बैसाणे यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र व पदभार मानवाधिकार आयोग आणि भ्रष्टाचार विरोधी समितीचे फाउंडर तथा नॅशनल प्रेसिडेंट अशोक पवार तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती तसेच सामाजिक वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. संजीव बैसाणे यांनी हा सन्मान आपल्या उद्योगाशी निगडित सर्व सहकारी व कुटुंबीयांचा असल्याचे सांगितले. भविष्यातही बांधकाम व्यवसायात उत्कृष्ट सेवा देत सामाजिक बांधिलकी जपत कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच मानवाधिकार संरक्षण आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी संघटनेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात प्रभावीपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

श्री. संजीव बैसाणे यांना मिळालेला राज्यस्तरीय ‘उद्योग रत्न’ पुरस्कार आणि चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून विविध सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 132
Previous Post

३६ वर्षे ८ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेला भावपूर्ण निरोप

Next Post

राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

Next Post
राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us