Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2022
in संस्कृती, शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी हे मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॕड.संदीप सुरेश पाटील यांनी भूषविले. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील व मुख्याध्यापिका ममता न्याती यांनी विठ्ठल रुखमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर इयत्ता पाचवी, आठवी व नववी वर्गातल्या विद्यार्थीनींनी विठू माऊलीच्या गीतांवर नृत्य सादर केले. यासाठी नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेपासून जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत ढोल, ताशे व लेझीम पथकासह पायी दिंडी काढण्यात आली. यामध्ये विठू रुखमाईच्या नामाचा जय घोष करीत सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात सामील झाले.
कलाशिक्षक शकील अहमद शेख यांनी शाळेच्या फलकावर आषाढी एकादशीनिमित्त सुंदर असे आकर्षक चित्र रेखाटले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमन पटेल यांनी केले तर आषाढी एकादशीचे महत्त्व सुषमा पाटील यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी मानसी शिंदे व खुशी पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिक्षक सादीक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 542
Previous Post

आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी….!

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी….!

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us