Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2022
in संस्कृती, शिक्षण
0
आषाढी एकादशीनिमित्त प्रताप विद्या मंदिरात भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन
लोकप्रवाह,चोपडा दि. १० जुलै  : येथील प्रताप विद्या मंदिराने आषाढी एकादशीचे औचित्य साधत  शहरात भव्य व नयनरम्य अशा ज्ञानदिंडीचे आयोजन केले. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख सहभाग असलेल्या या दिंडीने शहरातील सर्व परिसर विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून गेला. ज्ञान दिंडीच्या माध्यमातून प्रताप विद्या मंदिराच्या विविध विभागांनी पथनाट्य व गीते सादर करत समाज प्रबोधनाचा वसा आणि वारसा या दिंडीच्या निमित्ताने पुढे चालवला. महाराष्ट्रातील संत परंपरेने केलेल्या समाज प्रबोधनावर सकाळ विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपशिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजप्रबोधनपर पथनाट्य सादर केले. तसेच समाजासमोर भेडसावणाऱ्या कोरोना सारख्या विविध समस्यांवर भाष्य करणारे एक द्विपात्री नाटक दुपार विभागाच्या विद्यार्थ्यांनी तुषार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. स्वच्छतेचा संदेश देत गाडगेबाबांचा संदेश समाजात रुजविण्याच्या हेतूने गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले, त्यांना सर्व शिक्षक भगिनींचे मार्गदर्शन लाभले. तर याच विद्यार्थ्यांनी के बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले. उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी देखील पी. पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती विषयक पथनाट्य सादर करत समाजप्रबोधनाचे कार्य केले.
विठू माऊलीच्या नामघोषाने टाळ मृदंगाच्या गजरात आयोजित केलेल्या या ज्ञान दिंडी सोहळ्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माई च्या वेशात समाज प्रबोधनाचे कार्य केले. वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून उतरवला गेला.यावेळी शाळेच्या प्रांगणात शिक्षकांच्या रिंगण सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक पी डी पाटील, एस एस पाटील, एम डब्ल्यू पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एच पाटील, समन्वयक गोविंद गुजराथी तसेच विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
Post Views: 433
Previous Post

चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न…!

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us