Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ग.स.सभासदांसाठी नैसर्गिक विमा योजना यांसह विविध योजना राबविण्यासाठी कटिबद्ध : उदय पाटील

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 25, 2022
in जिल्हा, तालुका विशेष
0
ग.स.सभासदांसाठी नैसर्गिक विमा योजना यांसह विविध योजना राबविण्यासाठी कटिबद्ध : उदय पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २५ जुलै – जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी जळगांव अर्थात ग.स सोसायटी तर्फे आज शहरातील नारायण वाडी मधील विठ्ठल मंदिरासमोर जेष्ठ नागरिक सभागृहात संस्थेत अखंड २५ वर्ष तसेच ३० वर्ष सभासद झालेल्या तालुक्यातील ९५ सभासदांना पाच हजार एक रुपयांचा धनादेश देत सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक पतपेढी चे माजी अध्यक्ष आर.एच.बाविस्कर सर होते. कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच  दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हि.मा. करोडपती विद्यालयामधील विध्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले.
यावेळी व्यासपीठावर सहकार गटाचे कोषाध्यक्ष व्ही.झेड.पाटील, संचालक रमेश शिंदे, माजी मुख्याध्यापक मधुकर पाटील, जेष्ठ शिक्षक रमेश भोईटे, सहकार गटाचे अध्यक्ष तथा ग.स.चे अध्यक्ष उदय पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, माजी अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, गटनेते तथा संचालक अजबसिंग पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा संचालक अजय देशमुख, कर्ज नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा संचालक योगेश इंगळे, संचालक भाईदास पाटील, महेश पाटील, योगेश सनेर, मंगेश भोईटे, जळगांव शिक्षण विस्तार अधिकारी तथा संचालक विजय पवार, माजी संचालक देवेंद्र पाटील, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे, संस्थेचे व्यवस्थापक वाल्मिक पाटील, लेखापाल श्यामकांत सोनवणे, प्रशासन अधिकारी महेंद्र मोरे, शाखाधिकारी संजय साळुंखे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांच्या काळात संस्थेत जेष्ठ सभासद सन्मान निधी योजना, राजमाता जिजाऊ कन्यादान योजना व सावित्रीबाई फुले योजना अश्या विविध योजना सुरुवात करण्यात आली. संस्थेत यावेळी ही सभासदांनी सहकार गटाला कौल दिल्याने गटाने निवडणुकीपुर्वी ज्या सभासदांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली आहे यात कर्जावरील व्याजदर कमी, कर्ज वाढ, ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाली असून आता सभासदांना जामीनदाराची माहिती कुठल्याही शाखेत मिळु शकते. आगामी सर्वसाधारण सभेमध्ये मयत सभासदांना शंभर टक्के कर्ज माफी, तसेच जनता अपघात विमा ३ लाखावरून १० लाखापर्यंत लवकरच करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.एच. बाविस्कर आपल्या भाषणात म्हटले की, सभासदांनी सहकार गटाला कौल दिल्याने अध्यक्ष उदय पाटील हे सभासदांच्या हिताचे निर्णय घेतील व सभासदांसाठी नवनवीन योजना आणतील अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी संस्थेचे माजी संचालक रमेश शिंदे, सन्मानप्राप्त शिक्षक अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे स्वागत चोपडा शाखेतील कर्मचारीवृंदानी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक मंगेश भोईटे यांनी व सुत्रसंचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन संचालक योगेश सनेर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चोपडा शाखेतील कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.
Post Views: 396
Previous Post

चोपडा-धनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्डयांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी द्या; चोपडा मनसेची मागणी !

Next Post

चोपड्यात साईबाबा काॅलनी येथील पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात !

Next Post
चोपड्यात साईबाबा काॅलनी येथील पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात !

चोपड्यात साईबाबा काॅलनी येथील पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us