Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज प्राथमिक विद्यालयात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 31, 2022
in शिक्षण
0
पंकज प्राथमिक विद्यालयात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ३१ जुलै – येथील पंकज प्राथमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. निमगव्हाण व चोपडा शहर केंद्राचे केंद्रप्रमुख दिपक पाटील हे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदच्या अध्यक्षस्थानी होते. तर शिक्षण परिषदेला व्यासपीठावर पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सुलभक समाधान बाविस्कर, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन  या वर्षातील पहील्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा प्रारंभ करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख दिपक पाटील
यावेळी पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत शिक्षण व मुलभूत क्षमता प्राप्त करणे यासाठी सर्व शाळेतील  शिक्षकांनी नियोजनानुसार अध्यापन करावे, तसेच विद्याप्रवेश व सेतू अभ्यासक्रम या विविध उपक्रमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे केंद्रप्रमुख दिपक पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना सूचना केल्या त्यासोबतच अनेक प्रशासकीय विषय स्पष्ट केले.
“जीवन कौशल्य स्व-ची जाणीव” या विषयावर योगेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. “चला तंत्रस्नेही होऊ या” या विषयावर समाधान बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय निपुण भारत अभियानानुसार पायाभूत व गणितीय साक्षरता या विषयाच्या चर्चेत सर्व शाळांनी सहभाग घेतला. सदरील शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी दिलीप बाविस्कर, रवि शार्दूल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन आर डी पाटील यांनी केले.
Post Views: 376
Previous Post

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ; इतिहास आणि महत्व जाणून घ्या..

Next Post

चौगांव येथील किल्ले विजयगड येथे गडसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम संपन्न 

Next Post
चौगांव येथील किल्ले विजयगड येथे गडसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम संपन्न 

चौगांव येथील किल्ले विजयगड येथे गडसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us