Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बारी समाजातील गुणवंतांचा गौरव; स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 20, 2022
in सामाजिक
0
बारी समाजातील गुणवंतांचा गौरव; स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २० आॕगस्ट : येथील बारीवाड्यात सूर्यवंशी बारी समाज पंच मंडळ, बारी समाज महिला मंडळ व नागवेल मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या या गौरव समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस माया महेंद्र बारी (ऐनपुर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
       दरवर्षीप्रमाणे व आजादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा होत असताना बारीवाड्यात विविध वयोगटांसाठी हस्ताक्षर, रंगभरण, सामान्य ज्ञान, रांगोळी व वक्तृत्व या स्पर्धेंचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेंमधील विजेत्यांना व समाजातील दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच एलआयसीतर्फे MDRT पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल प्रदीप (देवेंद्र) पंडित बारी, सी.बी.निकुंभ हायस्कूल,घोडगांव च्या पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल वसंत आनंदा नागपुरे यांचा तर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विजेते ठरलेल्या संजय रघुनाथ बारी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
         प्रारंभी भारत माता व संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पंचमंडळाचे अध्यक्ष किरण बारी, उपाध्यक्ष विलास बारी, सचिव प्रदीप बारी, महिला मंडळाच्या अध्यक्ष रुख्मा बारी, उपाध्यक्षा छाया बारी, नागवेल मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश बारी, समाजातील ज्येष्ठ मोहन बारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय बारी, योगेश बारी, चेतन बारी, शिवदास बारी, भगवान बारी, संजय बारी, सचिन बारी, रवींद्र बारी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. गुणगौरव समारंभास समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 472
Previous Post

चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

Next Post

चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post
चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us