Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धक्कादायक..! सावत्र मुलाने केला सावत्र आईच्या डोक्यात दांडका मारून खून!! गलंगी येथील घटनेने तालुका हळहळला

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 26, 2022
in क्राईम
0
धक्कादायक..! सावत्र मुलाने केला सावत्र आईच्या डोक्यात दांडका मारून खून!! गलंगी येथील घटनेने तालुका हळहळला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह,चोपडा दि. २६  – तालुक्यातील गलंगी येथील सावत्र आईच्या डोक्यात रात्री भर झोपेत सावत्र मुलाने लाकडी दांडका मारून खून केल्याची घटना सोमवारी (२६ रोजी) सकाळी उघडकीस आली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव सहाबाई मगन उर्फ वेस्ता बारेला (वय 42) रा. गलंगी ता. चोपडा असे नाव आहे. याप्रकरणी सावत्र मुलगा आरोपी दीपक वेस्ता बारेला (वय 25) याला चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
            याबाबत घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयित आरोपी सावत्र मुलास ताब्यात घेतले आहे. व त्याच्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सी.सी.टि.एन.एस. गुरनं. १२८/२०२२ भादंवि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमर वसावे हे करीत आहे.
घटनास्थळी पंचनामा करतांना तपासाधिकारी पोउनि. अमर वसावे व इतर..
     तपासाधिकारी पोलीस उपनिरिक्षक अमर वसावे यांनी दिलेली माहिती अशी की, सहाबाई वेस्ता बारेला आणि तिचे पती बारेला हे गलंगी येथे शेतमालकाच्या घराशेजारी झोपडी करून राहत होते. काही महिन्यापूर्वीच नव्याने वेस्ता बारेला याच्यासोबत संसारासाठी सहाबाई बारेला या विवाह करून आलेल्या होत्या. त्यातच पहिल्या पत्नीचा मुलगा दीपक बारेला हा बाहेरगावी कामानिमित्त होता. परंतु काही कार्यक्रमानिमित्त तो गलंगी येथे त्यांच्याकडे आला होता. तो घरी आल्यामुळे सावत्र आईने तु येथे का आला? तू येथून निघून जा असे सांगितले. त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने रात्री भर झोपेत असतांना सावत्र आईच्या डोक्यात दांडका मारून गंभीर जखमी केले. यातच सहाबाईचा जागेवरच मृत्यू झाला. सकाळी गलंगी येथील पोलीस पाटील देवराज यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला फोनवरून ही घटना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली व संशयित आरोपी सावत्र मुलाला ताब्यात घेतले.
Post Views: 775
Previous Post

२८ रोजी ʼकिस्से स्वरलतेचेʼ मसाप तर्फे आयोजन

Next Post

कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!

Next Post
कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!

कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या "वर्षग्रंथ-2022" चे प्रकाशन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us