Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 26, 2022
in शिक्षण
0
कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!
लोकप्रवाह, चोपडा दि. २६ – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एनबीए मानांकन प्राप्त श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील फार्मसी महाविद्यालयात “वर्षग्रंथ -2022” या वार्षिक मासिकाचे प्रकाशन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी  यांच्या हस्ते दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले. सदरहू कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्रा. डि.बी. देशमुख उपस्थित होते.
                 सर्वप्रथम प्राचार्य डॉ. जी. पी. वडनेरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कुलगुरूंचे महाविद्यालयामध्ये आगमन झाले हा एक सुवर्णयोग जुळून आला आहे. आम्ही परीक्षार्थी आहोत. आपल्या येण्याने महाविद्यालयाचा व आम्हा सर्वांचा भाग्योदय झाला असे मनोगत यावेळी प्रस्तावनेत व्यक्त केले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कुलगुरूंनी विद्यार्थांना उद्योजकीय क्षेत्रातील विविध वाटा शोधण्यासाठी प्रेरित केले. ते म्हणाले नोकरी शोधणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हा. तसेच त्यांनी वर्षग्रंथ मध्ये समाविष्ट असलेल्या विविध विषयांवरील लेख, कविता व नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ संकल्पना याचे मनस्वी कौतुक प्रकाशनावेळी केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुलगुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व धैर्य वाढणार असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील यांनी व्यक्त केले. वर्षग्रंथच्या संपादिका डॉ. सुवर्णलता महाजन व संपादकीय विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम तसेच विद्यार्थ्यांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद या सर्वांचे तसेच वर्षग्रंथ प्रकाशनाची परंपरा जोपासल्याबद्दल अॕड.संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी अभिनंदन केले.
          सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. संदीप पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, प्रबंधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
Post Views: 344
Previous Post

धक्कादायक..! सावत्र मुलाने केला सावत्र आईच्या डोक्यात दांडका मारून खून!! गलंगी येथील घटनेने तालुका हळहळला

Next Post

गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय – अरुणभाई गुजराथी

Next Post
गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय – अरुणभाई गुजराथी

गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय - अरुणभाई गुजराथी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us