Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 28, 2022
in तालुका विशेष
0
चोपड्यात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हिंदू जागरण मंचासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – हिंदु महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी व श्रध्दा वालकर या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नराधम आफताबला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीकरीता आज रोजी सकाळी १० वाजता विश्राम गृहापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेनरोड मार्गे चावडी व शेवट गांधी चौक येथे अशी भव्य रॕली काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येत हिंदु बांधव व भगिनी सहभागी झाले. या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले हे विशेष! तसेच शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवत या मोर्चात सहभागी झाले.
तहसीलदार अनिल गावीत व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या निवेदन देतांना हिंदु महिला भगिनी..
या विराट मोर्चाची सुरुवात विश्रामगृहापासून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. रॕलीमध्ये “श्रद्धा हम शर्मिंदा है, तेरा कातील जिंदा है”, “आफताबला फाशी, झालीच पाहिजे” “वंदे मातरम” व “भारत माता की जय” आदि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
हिंदू जागरण मंच तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनामुळे स्वयंस्फूर्तपणे हिंदु बांधव यामध्ये सहभागी झालेत. गांधी चौक येथे जळगांव महानगरपालिका नगरसेविका अॕड. सुचिता हाडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक विद्यार्थी परिषद विद्यार्थीनी चोपडा शहरमंत्री कोमल गोसावी यांनी तर आभार हिंदु जागरणा मंचाचे जिल्हा युवा आयाम प्रमुख डॉ. राहुल पाटील यांनी मानले. यावेळी तहसीलदार अनिल गावीत व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. सदर मोर्चामध्ये हिंदु जनजागरण मंचासह सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्वपक्षीय सहभागी होते. संपुर्ण मोर्चादरम्यान शहर पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Post Views: 606
Previous Post

भाजपवाल्यांनी सूतगिरणीमध्ये एकही सभासद केला असेल तर दाखवावा; अरुणभाई गुजराथींचे जाहीर आवाहन!!

Next Post

सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन

Next Post
सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन

सत्रासेन आश्रमशाळा येथे संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us