Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 10, 2022
in क्राईम
0
अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
लोकप्रवाह, चोपडा दि. १० डिसें. (संदिप ओली) – घरी एकटी असलेल्या अल्पवयीन सहा वर्षीय बालिकेला बोरं खाण्याकरीता देण्याचे आमिष दाखवून तिला गावाबाहेर निर्जनस्थळी नेऊन तिचे हातपाय बांधून विनयभंग करून अत्याचार करण्याच्या तयारीत असतांना घटनास्थळावर ७८ वर्षीय वृद्ध भाऊलाल कोळी आल्याने आरोपी पळून गेल्याची घटना आडगाव (ता.चोपडा) येथे अकरा महिन्यांपूर्वी घडली होती. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोक्सो कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचे कामकाज अमळनेर जिल्हासत्र न्यायालयात अंडर ट्रायल चालविण्यात येऊन आरोपीला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हा ऐतिहासिक निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश- २ पी.आर.चौधरी यांनी दिला.
तपासाधिकारी पोउनि. घनश्याम तांबे व पोहेकाँ. प्रदिप राजपूत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील आई व वडील कामाला गेले असतांना त्यांची सहा वर्षाची अल्पवयीन मुलगी एकटी घरी असल्याचे पाहून गावातील बाबुलाल बारकू भिल (३०) हा तरुण घरी आला यावेळी त्याने अल्पवयीन बलिकेला बोरं खायला जाऊ असे आमिष दाखवून तिला गावाबाहेर नाल्यात निर्जनस्थळी नेऊन तिचे हातपाय बांधून अत्याचार करण्याच्या तयारीत असतांना त्याच रस्त्याने शेतातून घरी जाणाऱ्या ७८ वर्षीय वृद्ध भाऊलाल कोळी यांना लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी त्या दिशेने पुढे जाऊन बघितले असता तिथे बाबुलाल बारकू भिल हा अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करतांना दिसला. वृद्धाला बघून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर त्यांनी लहान बालिकेला घरी आणून कुटुंबियांना घटनेची माहिती दिली
आरोपी बाबुलाल बारकु भिल
   या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भाऊलाल कोळी यांना लकवा झाला होता. न्या.पी. आर. चौधरी यांनी कोर्ट कमिशनर अॕड. आर. व्ही. निकम व दोन्ही पक्षांच्या वकीलांना भाऊलाल कोळी यांच्या घरी जाऊन जवाब नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार बेडवर असलेल्या साक्षीदाराचे त्याच्या घरी जाऊन जवाब घेण्यात आले.
याबाबत पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला दि. ११ जानेवारी २०२२ रोजी गुरनं.९/२०२२ अन्वये भादवि कलम-३५४ (ब),(ड) पोस्को कायदा ८ व १२ नुसार बाबुलाल बारकू भिल (२९) रा.आडगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकाँ. प्रदीप राजपूत यांनी फरार आरोपीला आठ दिवसात अटक करून अवघ्या पाच दिवसात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्याचे कामकाज अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अंडर ट्रायल चालवून साक्षीदारांची साक्ष व तपासी अधिकारी घनश्याम तांबे यांनी केलेला गुन्ह्याचा तपास ग्राह्य धरून आरोपीला कलम ३५४ प्रमाणे सात वर्षाची शिक्षा व पोक्सो कायदा कलम ८ प्रमाणे पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सदर ऐतिहासिक निकाल अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश-२ पी.आर.चौधरी यांनी गुरुवार दि.०८ डिसेंबर रोजी दिला. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता अॕड. किशोर बागुल यांनी तर पैरवी अंमलदार म्हणून पोकॉ.नितीन कापडणे यांनी काम पाहिले.
Post Views: 483
Previous Post

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा बहुमान; फेस्कामच्या समितीवर निवड!!

Next Post

आता चोपडा येथे धावणार रेल्वेगाडी; अमळनेर – चोपडा रेल्वेमार्गाची अधिकाऱ्यांकडून चाचपणी!!

Next Post
आता चोपडा येथे धावणार रेल्वेगाडी; अमळनेर – चोपडा रेल्वेमार्गाची अधिकाऱ्यांकडून चाचपणी!!

आता चोपडा येथे धावणार रेल्वेगाडी; अमळनेर - चोपडा रेल्वेमार्गाची अधिकाऱ्यांकडून चाचपणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us