Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रेती चोरीची टीप देतो या कारणावरुन एकास मारहाण; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 29, 2022
in क्राईम
0
रेती चोरीची टीप देतो या कारणावरुन एकास मारहाण; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!!
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ डिसें. (संदिप ओली) – शहरातील गोरगांवले रोडवरील हॉटेल नाना जवळ फिर्यादी कुणाल प्रदिप पाटील रा. पाटीलगढी हा महसुल व पोलीस विभागाला रेती चोरीच्या टिप देतो या कारणावरुन फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, लाकडी काठी तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून सर्व नऊ जणांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, लाकडी काठी, होंडा हॉर्नेट मोटारसायकल, बजाज प्लॅटीना मोटारसायकल जप्त करण्यात आले.
             याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास गोरगावले रोडवरील हॉटेल नाना जवळ आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन, फिर्यादीस महसुल व पोलीस विभागाला, आमच्या रेती चोरीच्या टिपा का देतो? या कारणावरुन फिर्यादीस तुला खुप माज आला आहे, तुला तुझा जिव प्यारा नाही का, तुला संपवुन टाकतो अशी शिवीगाळ, दमदाटी करुन सर्व 9 आरोपींनी फिर्यादीस चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी नामे दिगंबर रविंद्र सोनवणे याने भगव्या रंगाच्या होंडा हॉर्नेट मोटार सायकलीस लावलेला लोखंडी रॉड काढुन, लोखंडी रॉडने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच आरोपी नामे सागर रविंद्र सोनवणे याने बाजुस उभी असलेल्या प्लॅटीना मोटार सायकलला बांधलेली लाकडी काठी काढून त्याने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करुन दुखापत केली म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा रजि. नं. 518 / 2022 भादंवी कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 नुसार सर्व नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये दिगंबर रविंद्र सोनवणे व सागर रविंद्र सोनवणे दोघेही रा. भोकर ता. जि जळगाव, ललित मनोहर कोळी व संदिप सज्ज्जन कोळी  रा. वडगाव सिम ता. चोपडा, ईश्वर सुरेश सपकाळे, विनय जितेंद्र सरदार, तुषार दिनकर सपकाळे, सचिन सुधाकर देवराज, चेतन राजेंद्र बाविस्कर सर्व रा. गोरगावले ता. चोपडा हे आरोपी असून सर्वांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले व प्रभारी सपोनि. संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.
Post Views: 1,299
Previous Post

आता चोपडा येथे धावणार रेल्वेगाडी; अमळनेर – चोपडा रेल्वेमार्गाची अधिकाऱ्यांकडून चाचपणी!!

Next Post

ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

Next Post
ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

ब्रेकींग न्युज..!! जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us