Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्याची अविका गायकवाड चित्ररंगभरण स्पर्धेमध्ये देशात सर्वप्रथम.. !

अवघ्या नऊ वर्षाच्या लेकीने उंचावली चोपडेकरांची मान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 26, 2023
in शिक्षण, तालुका विशेष
0
चोपड्याची अविका गायकवाड चित्ररंगभरण स्पर्धेमध्ये देशात सर्वप्रथम.. !

लोकप्रवाह, चोपडा दि. २६ जाने. (संदिप ओली) – येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थीनी अविका कमलेश गायकवाड ही “रंगोत्सव” सेलिब्रेशन नॅशनल अँड इंटरनॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशन, मुंबई  यांच्यातर्फे आयोजीत राष्ट्रस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धेत संपूर्ण देशातून सर्वप्रथम आली. या स्पर्धेत सर्व राज्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. अवघ्या नऊ वर्षाची अविकाने भारतातून प्रथम क्रमांक मिळविला. व आता तिची निवड आंतरराष्ट्रीय चित्ररंगभरण स्पर्धेत करण्यात आली आहे.

यापूर्वीही अविकाने बालवर्गात असताना चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्णपदक व सन्मानपत्र मिळविले आहेत. आता ऑइल पेस्टल कलर आपल्या छोट्या छोट्या बोटांच्या सहाय्याने कागदावर रंग एकत्र करून चित्रात स्वप्नमय आभास निर्माण करण्याचे तंत्र  शोधून ऑइल पेस्टल व रंगीत पेन्सिली अशा दोन्ही माध्यमात ती रंगकाम करते. अविकाला चित्रकलेचे बाळकडू  घरातूनच मिळाले. अविका ही सेवानिवृत्त कलाशिक्षक ए. ए. गायकवाड यांची नात असून प्रताप विद्या मंदिर येथील कलाशिक्षक कमलेश गायकवाड यांची मुलगी आहे. दोन पिढ्यांपासून कलेची सेवा करणाऱ्या गायकवाड परिवारात आता ही तिसरी पिढीही कलाक्षेत्रात आपली चुणूक दाखवत आहे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत अविकाचे दोन्ही लहान बंधू बालकलाकार चि. अविष्कार व चि.अंशू यांनाही सुवर्णपदक, सन्मानपत्र व आकर्षक रेस कार बक्षीस स्वरूपात मिळाले आहेत. असा हा कलेचा वारसा पुढे चालवणाऱ्या गायकवाड परिवारातील कलाकार सदस्यांना यापूर्वीही कलाक्षेत्रात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
अविकास पारितोषिक देत सन्मानित करतांना चोपडे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शैलाबेन मयुर, प्रा. इंद्रजीत भालेराव व इतर मान्यवर..
देशातून प्रथम म्हणून मिळालेल्या पारितोषिकाचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, किड्स स्टेट स्कुटी असे होते. प्राध्यापक जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर , चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेश जैन, प्रवीण सप्तर्षी, डॉ. विकास हरताळकर, प्रवीणभाई गुजराथी, जीवन चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते अविकाला आकर्षक स्मृतीचिन्ह, स्किड स्केट स्कुटी, गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अविकाच्या या लहान वयातील मोठ्या यशाबद्दल संस्था समन्वयक गोविंद गुजराथी, डी. टी. महाजन, उल्हास गुजराथी, मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी, सुनील पाटील, उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे, पर्यवेक्षक पी. डी. पाटील, एस. एस. पाटील, माधुरी पाटील, कलाशिक्षक पंकज नागपुरे तसेच शाळेतील सर्वच शिक्षकांनी अविकाचे कौतुक केले. अविकाच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून  कौतुक आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
Post Views: 650
Previous Post

२५०० रुपयाची लाच घेतांना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next Post

BREAKING NEWS.. भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के !

Next Post
BREAKING NEWS.. भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के !

BREAKING NEWS.. भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us