Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !

तर तब्बल ३६ महिलांची केली सुटका !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 4, 2023
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
चोपडा येथील कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, नऊ महिलांवर गुन्हा दाखल !
लोकप्रवाह, चोपडा दि. ०४ फेब्रु. (संदिप ओली) : शहरातील नगरपरिषदेमागील स्टेडियमलगत असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३६ तरुणींची सुटका केली असून यात ०९ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ०७ महिलांना अटक करण्यात आली आहे.
            शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल ३६ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ०९ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांच्यासह त्यांच्या पथकाने शुक्रवार ०३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या पत्र्यांच्या शेडवर छापा टाकला.
             यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल ३६ तरूणी आढळून आल्यात. सर्व तरूणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या ०९ महिलांवर पोहेकॉ. दिपक भावलाल विसावे यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला सी.सी. टी. एन. एस. गुरनं. 44/2023 स्त्रिया व मुलींचे अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. या कुंटणखान्यात  मध्यप्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल, राजस्थान कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केला जात होता.
              सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली चोपडा शहर पो.स्टे. प्रभारी सपोनि. अजित सावळे, संतोष चव्हाण, पोउनि. घनश्याम तांबे, पोहेकाँ. दिपक विसावे, प्रदिप राजपूत, पोना. विलेश सोनवणे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदिप भोई, जितेंद्र चव्हाण, महेंद्र साळुंखे, रवि पाटील, पोकाँ. विजय बच्छाव, सुमेरसिंग वाघेर, शुभम पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
Post Views: 1,923
Previous Post

सातबाऱ्यावर नाव लावणेसाठी लाच; महिला तलाठीला एसीबीकडून रंगेहाथ अटक!

Next Post

चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 

Next Post
चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 

चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us