Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त यशस्वी आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 28, 2023
in शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न
लोकप्रवाह, चोपडा दि. २८ फेब्रु. (संदिप ओली) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न डॉ. सी.वी. रमण यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील,  डॉ. सचिन काटे, डाॕ. वैभव पाटील, एन. एस. सोनवणे, डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा परीक्षक डॉ. लालचंद पटले, प्रीती रावतोळे, टी. एस. पिंजारी, संगीता पाटील, हरेश चौधरी, जितेंद्र पाटील, अतुल पाटील, कुणाल गायकवाड, डॉ. शैलेश वाघ, डी. पी. सोनवणे, शाळा समन्वयक अमन पटेल, अश्विनी पाटील,  सुचिता पाटील व दिपाली पाटील आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
         याप्रसंगी विद्यार्थ्यांना कुणाल गायकवाड, प्रीती रावतोळे व अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता १ली ते ८ वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांवर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपयोजित विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचा समावेश देखील या विज्ञान प्रदर्शनात होता. विविध आकर्षक व माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमातून दैनंदिन समस्यांवरील उपाय विद्यार्थ्यांनी सुचविले. तसेच इयत्ता १ली आणि २ री च्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी सूर्यमाला, प्रकाश तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, पशु, पक्षी, झाडे, वेली, फुले व फळे यांचे प्रतिनिधित्व करणारा पोशाख परिधान केला होता.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कलाशिक्षक शकील अहमद यांनी उत्कृष्ट असे आकर्षक फलक रेखाटन केले. विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक कल्पना बारी, साक्षी बिडकर, हेमांगी पाटील, अर्चना जैन, धनश्री पवार,  पूजा अग्रवाल यांचे  मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका साक्षी बिडकर आणि पूजा अग्रवाल यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षिका अर्चना जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 431
Previous Post

गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास अटक; तब्बल ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

Next Post
चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us