Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !

विषमतेला फाटा देत समानतेचा दिला संदेश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 3, 2023
in वर्धा जिल्हा, विदर्भ, वैशिष्ट्यपूर्ण
0
वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०३ जून : पतीच्या दीर्घायुष्याची कामना करीत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करीत वटवृक्षाला फेऱ्या मारुन आणि सूत्र गुंडाळून वटसावित्री पोर्णिमेचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र या परंपरेतील विषमतेला फाटा देत स्त्रीपुरुष समानतेचा व वृक्षारोपणाचा संदेश देणारी एक आगळीवेगळी वटपौर्णिमा वर्धा शहरात साजरी करण्यात आली.
स्थानिक निसर्ग सेवा समिती परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी विविध जोडपी वटपौर्णिमेच्या सकाळी एकत्र आली. यावेळी स्त्रियांनीच आपल्या नवऱ्यासाठी व्रतवैकल्ये करावीत, त्यांच्या पाया पडावे, दीर्घायु लाभण्यासाठी उपवास करावा या असमानता रुजविणाऱ्या परंपरेला नाकारत या जोडप्यातील पुरुषांनी पत्नीचे पूजन केले, रोप देऊन तिचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या चक्क पाया पडत तिच्या दीर्घायुष्याची कामनाही त्यांनी केली. तसेच पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला. याठिकाणी जमलेल्या सर्व जोडप्यांनी मिळून परिसरात वड व अन्य वृक्षांची रोपे लावली व वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रदक्षिणाही घातली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात डॉ. शोभा व मुरलीधर बेलखोडे, सुरेखा व भाऊ थुटे, प्रा. वनिता व प्रशांत देशमुख, संगीता व संजय इंगळे तिगावकर, शोभा व दामोदर राऊत, संजीवनी व दत्तात्रय कानसकर, वनिता व बाबाराव भोयर, डॉ. मेघा व सुहास लांडगे, वर्षा व प्रफुल्ल लिंगावार, विद्या व प्रमोद भोयर, वैष्णवी व स्वप्नील देशमुख, जयश्री व दिलीप वाकडे, मनीषा व विजय भगत, शीतल व निलेश बाभळे, शीतल व अनुप खडसे, विजयश्री राजेंद्र साळुंखे, यशवंत नलोडे, कृष्णा खडसे, विजयश्री राजेंद्र साळुंखे, यशवंत नलोडे, कृष्णा आखरे, डॉ. अनिल लोणारे, राजकुमार वासेकर, राजेंद्र घोडमारे, अरविंद मेश्राम, बाबाराव सावरकर, अनिल देवतळे, प्रफुल्ल द्रव्यकर, श्रीराम नौकरकर, जनार्दन खोत, गौतम फुलमाळी, नितीन डगवार, विजय भगत, देवीप्रसाद उपाध्याय, रमेश बेद, बाळकृष्ण पडवे, अजय तिगावकर, वसंत बाभूळकर, अमित शिंदे, राधिका भोयर, संजीव शेळके आदी सहभागी झाले होते. यावेळी वृक्षारोपण करून एका विद्यार्थिनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
Post Views: 1,423
Previous Post

ग.स. शाखाधिकारी शिवाजी बाविस्कर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न !!

Next Post

विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 

Next Post
विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 

विर छावा संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विक्की डाहुले यांची नियुक्ती 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us