Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 1, 2023
in शेती विषयक, चोपडा, जळगांळ जिल्हा, शिक्षण
0
चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ जुलै : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य एस. पी. पाटील, पी. एस. पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. डी. कर्दपवार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हे हरित क्रांती व श्वेत क्रांतीचे जनक असून त्यांच्या शेती सुधारणाविषयक कार्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी १९७२ च्या दुष्काळाचा प्रतिकार करू शकले. स्व. वसंतराव नाईक यांनी ‘कसेल त्याची शेती’ व ‘ शेती मोडली तर लोकशाही मोडेल’ असा नारा देत त्यांच्या कारकीर्दीत शेती विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एच. देवरे यांनी केले तर आभार एस. जी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.
Post Views: 284
Previous Post

चोपडा रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी चेतन टाटीया यांची निवड

Next Post

समाजाची अपेक्षापूर्ती करणे हेच रोटरीचे ध्येय – डॉ.आनंद झुनझुनवाला

Next Post
समाजाची अपेक्षापूर्ती करणे हेच रोटरीचे ध्येय – डॉ.आनंद झुनझुनवाला

समाजाची अपेक्षापूर्ती करणे हेच रोटरीचे ध्येय - डॉ.आनंद झुनझुनवाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us