Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

समाजाची अपेक्षापूर्ती करणे हेच रोटरीचे ध्येय – डॉ.आनंद झुनझुनवाला

चोपड्यात डायलिसीस मशीन लोकार्पण प्रसंगी केले प्रतिपादन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 1, 2023
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
समाजाची अपेक्षापूर्ती करणे हेच रोटरीचे ध्येय – डॉ.आनंद झुनझुनवाला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ जुलै : परिवारातील एक सद्स्य जर किडनी विकाराने त्रस्त झाला तर संपूर्ण परिवाराचे आर्थिक व मानसिक आरोग्य धोक्यात येत असते. जवळ पैसा असेल तर उपचार होऊ शकतात पण जर का आर्थिक स्थिती नाजूक असेल तर घरातला सदस्य आपल्या डोळ्या देखत मारतांना बघावे लागते. यापेक्षा दुसरे दुर्दैव नसावे, याच गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरीचे ध्येय असल्याचे मत दि. २९ रोजी डायलिसील सेंटर लोकार्पण प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ. आंनद झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.
डायलिसीस मशिन लोकार्पणाप्रसंगी उपस्थित मान्यवर
चोपडा रोटरी क्लब आणि हरताळकर हॉस्पिटल, चोपडा यांच्या वतीने दि. २९ रोजी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत दोन डायलिसिस मशीन लोकार्पणाचा महत्वकांक्षी सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्याकडून एक डायलिसिस मशीन देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रांतपाल डॉ. आनंद झुंनझुनवाला तर उद्घाटक म्हणून डॉ. विजय पोतदार, डॉ. विकास हरताळकर उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ. अमित भंगाळे, जळगाव येतील डॉ. राजेश पाटील, संदीप काबरा, चंद्रकांत सत्रा हजर होते. सदर डायलिसिस सेंटरचे प्रकल्प प्रमुख म्हणून संजीव गुजराथी व नितीन अहिरराव काम बघणार आहेत.
यात गरजू रुग्णांना नाममात्र सेवा शुल्क आकारून उपचार मिळणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना ते ही शक्य नसेल त्यांचा खर्च रोटरी उचलणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, माजी गटनेते जीवन चौधरी, सुनील जैन, आशिष गुजराथी, डॉ. राजेंद्र भाटिया, डॉ. प्रेमचंद महाजन, डॉ. अमित हरताळकर, डॉ. विनीत हरताळकर, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. नीता हरताळकर, जोत्स्ना हरताळकर, डॉ. मंगेश वैद्य, डॉ. दुर्गेश जैस्वाल, डॉ. दिपक चौधरी, डॉ. पराग पाटील, डॉ. आर. टी. जैन, डॉ. रविंद्र पाटील, डॉ. वैभव पाटील, रोटरी अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, मानद सचिव गौरव महाले, रोटे. पंकज बोरोले, रोटे. प्रवीण मिस्तरी, रोटे. चेतन टाटीया, मोनिका झुंनझुंनवाला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रुपेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.
Post Views: 347
Previous Post

चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

Next Post

चोपडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोप संपन्न

Next Post
चोपडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोप संपन्न

चोपडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोप संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us