Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सेवापूर्तीनिमित्त शाळेला दूरदर्शन संच दिला भेट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 1, 2023
in वैशिष्ट्यपूर्ण, चोपडा, शिक्षण
0
मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सेवापूर्तीनिमित्त शाळेला दूरदर्शन संच दिला भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ जुलै – शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मुलांच्या खिचडीत शासकीय वाट्यासोबत स्वतःचा आर्थिक हिस्सा देवून खिचडी अधिक चविष्ट बनवणारे, आपल्या कार्यकाळात कमीतकमी रजा घेणारे, प्रामाणिक व गरीब विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वस्तूंची मदत करणारे बहुआयामी, निर्व्यसनी व विनम्र व्यक्तिमत्व असणाऱ्या मुख्याध्यापक विलास पाटील यांची निष्कलंक प्रामाणिक सेवासमाप्ती झाल्याचे प्रतिपादन कवी अशोक निळकंठ सोनवणे यांनी केले. सदगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पंढरीनाथ पाटील (खेडीभोकरीकर) यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शाळेला दुरदर्शन संच (TV) भेट देतांना
शहरातील माध्यमिक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शिक्षक म्हणून आपल्या चांगल्या शैक्षणिक कर्तव्यासोबतच सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सुंदर काम केलंय अशा शब्दांत त्यांचा कार्यगौरव करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुख्याध्यापक विलास पाटील यांच्या सेवा कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त करण्यात  आली. संस्थेच्या विविध विभागांतर्फे तसेच अनेकांनी व्यक्तीगत सत्कार केले. नुकतेच त्यांच्य मोठ्या वहिनींचे अकस्मात निधन झाले असल्याने सेवापूर्तीचा कार्यक्रम व भोजन खर्च टाळत विद्यार्थी हिताच्या भूमिकेतून तांदळवाडी हायस्कूलला ४३ इंची १ अँड्रॉईड टिव्ही भेट देण्यात आला. याआधी सुद्धा त्यांनी गतवर्षी कन्या विद्यालयास सर्व वर्ग डिजीटल करणेकामी पुढाकार घेत स्वतः ४३ इंची २ अँड्रॉईड TV संच दिले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील हे  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे कार्याध्यक्ष असून ते रोटरी क्लब ऑफ चोपडाचे माजी अध्यक्ष तथा माय मराठी महाराष्ट्र संघ राज्यउपाध्यक्ष, सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
याप्रसंगी माजी संस्थापक संचालक अॕड. डी. पी. पाटील, विद्यमान उपाध्यक्ष सतीश गोकूळ पाटील, सहसचिव अॕड. हृषिकेश मच्छिंद्रनाथ पाटील, सर्वश्री संचालक ज्ञानेश्वर नारायण पाटील, डॉ. पवन डोंगर पाटील, राजाराम भावलाल पाटील, जितेंद्र रामलाल पाटील, गोविंद रमेश पाटील, पद्माकर जीवनलाल चौधरी, योगराज गोकूळ पाटील, तसेच अॕड. यु. के. पाटील, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, मुख्याध्यापक जोशी वडती उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक डी. जे. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. पाटील यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी केले.
Post Views: 575
Previous Post

चोपडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोप संपन्न

Next Post

चोपडा भाजपच्या वतीने रोहीत निकम यांचा सत्कार संपन्न

Next Post
चोपडा भाजपच्या वतीने रोहीत निकम यांचा सत्कार संपन्न

चोपडा भाजपच्या वतीने रोहीत निकम यांचा सत्कार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us