Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम संपन्न

आमदार लताताई सोनवणे यांची होती प्रमुख उपस्थिती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 9, 2023
in तालुका विशेष, शेती विषयक, सहकार
0
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ जुलै – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. ८ रोजी आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते तर माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे शुद्धिकरण यंत्र (आरओ) व वॉटर कुलर, हमाल मापाडींसाठी आरोग्य तपासणी शिबिर तसेच हमाल – मापाडी यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व वह्यावाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले.
गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना आ. लताताई सोनवणे, कृउबा सभापती नरेंद्र पाटील, संचालक व इतर
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आ. लताताई सोनवणे यांचा सत्कार सभापती नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र व केंद्र शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंर्गत दिले जाणाऱ्या बियाण्यांचे कृषी विभागाकडून लाभार्थीना मोफ़त वाटप करण्यात आले. यामध्ये कापूस, उडीद, तूर, सोयाबीन, नाचणी, बाजरी, भुईमुग, भात, मका, वरई/भगर आदी बियाण्यांचा समावेश होता. सदर वाटप आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे  १ रुपयात दिला जाणारा पीक विमाही काढण्यात आला. सदर विमा अनेक शेतकऱ्यांनी काढला.
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर
यावेळी जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण, संचालक अॕड. घनश्याम पाटील, नितीन पाटील, सुकलाल कोळी, किरण देवराज, नंदकिशोर पाटील, रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, सुनंदा पाटील, गोपाल चौधरी, सुनील बरडीया, सागर ओतारी, विक्की डॉक्टर, मिलींद पाटील, शिवराज पाटील, सुनील अग्रवाल आदिंसह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदिंची उपस्थिती होती.
याप्रसंगी तालुका कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे व कर्मचारी हजर होते. तर आरोग्य तपासणी शिबीरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलिमा देशमुख, मेडीकल कोआॕर्डीनेटर डॉ. दिनेश सोनवणे आदिंसह इतर कर्मचारी हजर होते.
Post Views: 748
Previous Post

चोपड्यात माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतलेंची भेट !

Next Post

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दशरथ चव्हाण

Next Post
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दशरथ चव्हाण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दशरथ चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us