Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 29, 2023
in आरोग्य, विशेष
0
रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २९ जुलै : रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु ज्यांना डॉक्टरांचे नावही योग्यपणे उच्चारता येत नाही, अशा आदिवासी रुग्ण महिलेचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द एका डॉक्टरांनीच रक्तदान केले, असा प्रसंग अभावानेच दिसून येतो. परंतु मानवतेला अधिक उंचीवर नेणारा हा प्रसंग सातपुड्यासारख्या देवगड या आदिवासी दुर्गम भागात घडून आला आहे.
रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांसोबत डॉ. आनंद राठोड
            चोपडा तालुक्यातील वैजापूर  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत देवझिरी येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात चार महिन्याची गरोदर असलेली एक २४ वर्षीय महिला आली. रक्तक्षय  झाल्याने अगदी अशक्त अवस्थेत तिला डॉक्टरांनी दाखल करुन घेतले. तपासणीअंती त्या महिलेचे हिमोग्लोबीन केवळ ४.८ टक्क्यांवर असल्याचे निष्पन्न झाले. साधारणत: ते १०-११ टक्केचे वर असावे लागते. त्यामुळे तिला बी पॉझिटिव्ह रक्ताची नितांत गरज होती. परंतु तिच्याकडे कोणीही रक्तदाता नाही, असे कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले. शेजारी किंवा हितसंबंधातील आणखी कुणी रक्त देऊ शकेल, असेही कुणीच नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.
सर्व प्रकार तिच्यावर उपचार करणारे तेथील समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) डॉ. आनंद मोतीराम राठोड यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी स्वत: रक्त देण्याचा निर्णय घेतला. क्षणभर त्यांच्या या निर्णयावर गरोदर महिलेच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसला नाही. परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी डॉक्टर स्वत: देवझिरी येथून ३५ ते ४० किलोमीटर दूर चोपडा गेले. तेथे रक्तदान केल्यानंतर रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या गेल्या आणि त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत परत येऊन त्या महिलेला रक्त चढवले गेले. रक्त शरीरात पोहचल्यानंतर महिलेच्या हिमोग्लोबीनमध्ये पुरेशी वाढ झाली तसेच गर्भातील बाळालाही योग्य पोषण प्राप्त झाले. दरम्यान ही महिला अशक्तपणापासून  सावरली आहे.
रक्तदान करतांना डॉ. आनंद राठोड
      डॉ. आनंद राठोड यांनी प्रसंगावधान राखून दिलेल्या अद्वितीय आरोग्यसेवेने आदिवासी बांधवांकडून तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 721
Previous Post

चोरीच्या चार दुचाकीसह चोरटे जेरबंद !!

Next Post

रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न

Next Post
रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न

रोटरॅक्ट क्लब व विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us