Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 14, 2023
in आरोग्य, चोपडा
0
“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १४ – तालुक्यातील अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत व “क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” या उपक्रमांतर्गत निवड झालेले अडावद, वटार व रुखनखेडा या गावांमध्ये क्षयरोग आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
क्षयरोगमुक्त गाव या उपक्रमांतर्गत जनजागृतीपर प्रभातफेरी काढतांना विद्यार्थी व अडावद, प्रा. आ. केंद्र कर्मचारी..
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरीता निबंध व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच ग्रामसभा व चावडी बैठका घेवून त्यात क्षयरोग आजाराविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना भेट देऊन “टीबी सपोर्ट ग्रुप” ची स्थापना करण्यात आली. वटार येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी गावांत प्रभातफेरी काढून त्यामध्ये “टी बी हारेगा, देश जितेगा”, “डॉट्सची गोळी, करी क्षयरोगाची होळी”, “क्षयरोगी कळवा, पाचशे रुपये मिळवा” अशा घोषणा दिल्या. ग्रामपंचायत बैठकीत उपस्थित सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व उपस्थित सर्व ग्रामस्थांना किशोर सैदाणे व आरोग्य सेवक विजय देशमुख यांनी सदर अभियानाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
                  सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वटार व रुखनखेड्याचे सरपंच, ग्रामसेवक जयंत पाटील, वरिष्ठ क्षयरोग तपासणी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैदाणे, आरोग्य सेवक विजय देशमुख, शिक्षक महाजन, सुलताने, आशा सेविका ज्योती कोळी, रेखा सोनवणे, गुलाब ठाकरे, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 307
Previous Post

चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात!

Next Post

अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

Next Post
अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us