Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्वाचा घटक आहे – एच. बी. मोरे

कस्तुरबा विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 15, 2023
in शिक्षण, चोपडा
0
विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्वाचा घटक आहे – एच. बी. मोरे
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १५ : विद्यार्थ्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना एकत्रीतरित्या काम करावे लागते. एकमेकांत विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. शाळेत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांत पालकांनी सहभागी व्हावे. स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा, यासाठी शाळाबाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवावे. विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच बी मोरे यांनी केले. कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाची पालक-शिक्षक सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कल्पना बोरसे, संगीता सोनवणे, पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
शिक्षक- पालक सभेत मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक एच. बी. मोरे
प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांनी सांगितले की, विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून इयत्ता १० साठी उन्हाळी वर्ग घेत आहोत तसेच इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस चे मोफत वर्गाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. यामध्ये विद्यार्थी गुणवत्तेत आला, तर त्यास शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते. अप्रगत तासिका वर्गही घेतले जात असून विद्यालयात संगणक कक्ष, स्मार्ट रूम व प्रयोगशाळा इ. सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पालक प्रतिनिधी मनोगत व्यक्त करीत असतांना उपस्थित मुख्याध्यापक एच. बी. मोरे व पर्यवेक्षक एस. एल. मोरे
उपस्थित पालकवर्ग
बालवाडी पासून ते दहावी पर्यंत आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. त्याला लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावायला हव्यात. शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावून मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे ही यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सविता पाटील व शिक्षक आनंदा जाधव या पालकांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस १४० पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयेश पाटील तर आभार कपिल बाविस्कर यांनी व्यक्त केले.
Post Views: 423
Previous Post

अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

Next Post

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

Next Post
आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us