Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा टॅलेंट हंट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 8, 2024
in शिक्षण, चोपडा
0
चोपडा टॅलेंट हंट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०८ – येथील चोपडा टॅलेंट हंट आयोजन समिती मार्फत आयोजीत चोपडा टॕलेंट हंट म्हणजेच CTH या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता 1 ली, 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत तब्बल 1324 विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. सदर परीक्षा ही दिनांक 4 फेब्रुवारी रविवार रोजी पंकज विद्यालय याठिकाणी मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच सीबीएसई माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. सदर परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेत याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा युगाची ओढ लागणे तसेच या स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी  सज्ज करणे होय. परीक्षा स्थळी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद पाटील व विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्यात.
अनेक शिक्षक पालक तसेच चोपडा शहरातील आणि तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी परीक्षा स्थळी येऊन नियोजनात भाग घेतला. पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने या CTH परीक्षेसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊन मोठे योगदान या गुणवत्तापूर्ण सामाजिक कार्यात केले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक पद्माकर पाटील, गुरु क्लासेस संचालक अश्विनी कुमार चौधरी तसेच समर्थ मॅथ्स अँड सायन्स अकॅडमी संचालक घनश्याम पाटील व विशाल मराठे यांनी मुख्यतः परिश्रम घेतले. परीक्षेच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले.
Post Views: 322
Previous Post

आशा व गटप्रवर्तकांना दिलेल्या आश्वासनाचे शासकीय परिपत्रक काढा!

Next Post

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे

Next Post
शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या - रणजित कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us