Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 25, 2024
in चोपडा, सामाजिक
0
लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि.२५ :- २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण भागात चालीरीती यांना फार महत्त्व दिले जाते. परंतु या सर्व चालीरीतींना बाजूला सारून अवाजवी पैसा खर्च न करता समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील लासूर येथील योगेश वाघ यांनी त्यांच्या आई व वडीलांच्या स्मृतीपित्यर्थ जिल्हा परिषद मुला व मुलींची शाळा यांना एक इंव्हर्टर संच व एलईडी टिव्ही संच देवून एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या दातृत्वाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
         तालुक्यातील लासूर येथील श्री नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटीचे संस्थापक चेअरमन तथा माजी ग्रा. पं. सदस्य स्व. नारायण दामोदर वाघ यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीवर अवाजवी खर्च न करता त्यांचे चिरंजीव योगेश वाघ यांनी आई व वडील यांच्या स्मृतीपित्यर्थ गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्युत पुरवठा नसल्यास गोरगरिब मुलांच्या शिक्षणासाठी ज्या काही अडचणी येतात त्या येवू नये म्हणून त्यांनी इंव्हर्टर संच आणि विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम बघता यावा यासाठी एलईडी टिव्ही संच भेट म्हणून दिले. वडिलांच्या दशक्रिया दिवशी जवळपास ७९,००० रूपये किंमत असलेल्या या भेटवस्तू त्यांनी शाळेला सुपुर्द केल्या. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व उप शिक्षक यांच्याकडे हि भेट सुपुर्द करण्यात आली. त्यांनी जपलेल्या या समाजभानाविषयी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
          याप्रसंगी चोपडा सहकारी सुतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ, शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, प्रा.अशोक पवार अमळनेर, माजी उपसरपंच अनिल पाटील, उपेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, मनिष पाटील, राकेश पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 283
Previous Post

अधिवेशन काळात कोळी जमातीचे आझाद मैदानावर पुन्हा ठिय्या आंदोलन.

Next Post

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us