Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

31839 बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 1, 2024
in आरोग्य, चोपडा
0
चोपड्यात रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी एकूण 195 बूथ तसेच 19 मोबाईल टीम, बाजार, एसटी स्टँड व नाके याठिकाणी नऊ ट्रांजिट टीम द्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. सदर लसीकरण मोहीम तालुक्यातील सर्व गाव, पाडे, दुर्गमभाग, शेत शिवार व वीट भट्टी या सर्व ठिकाणी राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये चोपडा तालुक्यातील एकूण 31 हजार 839 शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, नगरपरिषद विभाग, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचे मदतीने नियोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेचे सुसूत्रीकरण व समन्वय साधण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे अध्यक्षतेखाली तालुका टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीला गटविकास अधिकारी रमेश वाघ, नायब तहसीलदार सचिन बांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय धनगर हे उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व बालकांना वयोगटानुसार पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्याकरीता दक्षता घेणेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच सर्व पालकांनी आपल्या बालकांना घराजवळील पोलिओ बूथ वर जाऊन पोलिओ लसीचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सदर बैठकीमध्ये करण्यात आले. तसेच मंगळवारपासून तालुक्यातील ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस तब्बल  187 पथकाद्वारे घरोघरी भेट देऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली आहे.

Post Views: 324
Previous Post

डॉ. सी. आर. देवरे यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त

Next Post

वर्धा जिल्ह्यात उद्या ०३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Next Post
वर्धा जिल्ह्यात उद्या ०३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

वर्धा जिल्ह्यात उद्या ०३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us