Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरातील मुख्य रस्ते दुरुस्तीसह इतर समस्यांबाबत काँग्रेसचे मुख्याधिकार्यांना निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास मोर्चाचा दिला इशारा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 12, 2024
in चोपडा, राजकीय
0
चोपडा शहरातील मुख्य रस्ते दुरुस्तीसह इतर समस्यांबाबत काँग्रेसचे मुख्याधिकार्यांना निवेदन
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12– शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल मंदिर पर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झालेली आहे. म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. दिवसातून या रस्त्यांचा तीन ते चार वेळा कामानिमित्त वापर करावा लागतो, त्यामुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार शहरवासियांना जडलेले आहेत. चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे त्यामुळे तात्काळ डांबरिकरणातून ही हे रस्ते दुरुस्त करावीत अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना दिनांक 12 रोजी सकाळी साडे अकरा वाजता देण्यात आले. निवेदन स्वीकारतांना परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान सांगितले की, आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यासह चोपडा शहरात भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत. म्हणून या कुत्र्यांच्या त्वचेवरील जिवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे, म्हणून या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. चौका चौकात आणि गल्लोगल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात. तसेच हे मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात त्याच परिसरात मल(शेण) टाकतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. म्हणून मोकाट जनावरांचा ही बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी. आदी बाबींचाही समावेश सदर निवेदनामध्ये करण्यात आला आहे. या सर्व समस्यांवर तोडगा न निघाल्यास काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात येईल असेही निवेदना मध्ये नमूद करण्यात आले आहे.
        सदर निवेदन देतेवेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, रमेश एकनाथ शिंदे, मधुकर विठ्ठल पाटील, डॉ.अशोकराव कदम, मंगेश भोईटे, देविदास सोनवणे, किशोर पाटील, अकबर पिंजारी, सोहम सोनवणे, गौतम छाजेड, मोहन देवराम पाटील, प्रतापराव सोनवणे, धनंजय पाटील, विलास दारुंटे, देविदास पारधी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हाजी महमूद तेली, लक्ष्मण काविरे, दत्तात्रय साळुंखे, सतीश पाटील आदींसह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची  उपस्थिती होती.
Post Views: 646
Previous Post

आदिवासी भागातील नागरीकांच्या विविध समस्यांबाबत काँग्रेसचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

Next Post

बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – खासदार रामदास तडस

Next Post
बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – खासदार रामदास तडस

बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - खासदार रामदास तडस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us