Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकावर एसीबीची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2024
in पोलीस डायरी
0
वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, रावेर दि. 12 – तालुक्यात तक्रारदार व्यक्तीचे वाहन निंभोरा पोलीस स्टेशन येथे जप्त झाले होते. ते सोडण्याबाबत त्यांनी न्यायालयातून आदेश आणले. मात्र तरीही निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास ठाकूर यांनी वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराला १५ हजारांची लाच मागितली. अखेर तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना निंभोरा शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने अटक केली आहे.कैलास ठाकूर (वय ४०, रा. निंभोरा ता. रावेर) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते निंभोरा पोलीस स्टेशनला नियुक्त होते.

सुमारे चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. त्यातील वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला वाहन
देण्याबाबत आदेशित केले होते. मात्र निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास ठाकूर यांनी हे वाहन सोडविण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावला संपर्क करून तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. निंभोरा गावात मरीमाता मंदिराजवळ पीएसआय ठाकूर यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

सदर कारवाई हि पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,  नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पोकॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी केली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना लाच घेताना पकडल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post Views: 280
Previous Post

“अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसाचे शिबिर संपन्न

Next Post

चोपडा ललित कला केंद्रात एटीडीचा लागला 100% निकाल

Next Post
चोपडा ललित कला केंद्रात एटीडीचा लागला 100% निकाल

चोपडा ललित कला केंद्रात एटीडीचा लागला 100% निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us