Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

अंतिम मतदार यादी प्रसिध्द; मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 30, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 : येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे व आगामी काळात येणा-या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्ट्रीय कार्यात मदत करावी. तसेच राजकीय पक्षांनी आपले स्तरावरुन नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करावे. व राष्ट्रीय उपक्रमास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार 8 वर्धा लोकसभा मतदार संघातंर्गत आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा मतदार संघांची मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांनी माहितीसाठी सदर यादी मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार परिषेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनील गावीत, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार अतुल रासपायले उपस्थित होते.


आज दिनांक 30 ऑगस्ट प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार आर्वी विधानसभा मतदार संघात 1 लाख 32 हजार 647 स्त्री मतदार, 1 लाख 30 हजार 108 पुरुष मतदार असे एकुण 2 लाख 62 हजार 755 मतदार आहे. देवळी विधानसभा मतदार संघात 1 लाख 37 हजार 471 स्त्री मतदार, 1 लाख 34 हजार 296 पुरुष मतदार व इतर 2 असे एकुण 2 लाख 71 हजार 769 मतदार आहेत. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 1 लाख 50 हजार 498 स्त्री मतदार, 1 लाखा 44 हजार 130 पुरुष मतदार व इतर 1 असे एकुण 2 लाख 94 हजार 629 मतदार आहेत. वर्धा विधानसभा मतदार संघात 1 लाख 45 हजार 647 स्त्री मतदार, 1 लाख 44 हजार 599 पुरुष मतदार व इतर 12 मतदार असे एकुण 2 लाख 90 हजार 258 मतदार आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात 5 लाख 66 हजार 263 स्त्री मतदार, 5 लाख 53 हजार 133 पुरुष मतदार व 15 इतर मतदार असे एकुण 11 लाख 19 हजार 411 मतदार आहेत.

मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांचे नाव नोंदविण्यासाठी चारही विधानसभा मतदार संघतील मतदान केंद्रांवर दि.10, 11, 17व 18 ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच या कालावधीत भटक्या, विमुक्त जमातीच्या व असुरक्षित आदिवासी गट समाजाची गावांमध्ये विशेष शिबिराचे आयेाजन करुन मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये 85 गावांमधील 4 हजार 330 मतदार असून नविन 108 मतदार नोंदणी करुन घेण्यात करण्यात आली. जिल्ह्यातील कोलाम समाजाची एकुण 9 हजार 192 मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचे यावेळी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

तसेच 8 हजार 762 दिव्यांग मतदारांनी त्यांचे नावासमोर मदार यादीमध्ये दिव्यागत्वाची नोंद केली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात 1 हजार 634 नवमतदारांनी मतदार यादीत नावाची नोंद केली.
दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकवरील प्रारुप मतदार यादी नुसार एकुण मतदाराच्या तुलनेत दि. 6 ऑगस्ट पर्यंत 18 ते 19 वयोगटातील 20 हजार 178 मतदाराची व 20 ते 29 वयोगटातील 1 लाख 93 हजार 918 मतदारांची नोंदणी करण्यात आली. तर दि.30 ऑगस्ट पर्यंत 18 ते 19 वयोगटातील 24 हजार 477 मतदाराची व 20 ते 29 वयोगटातील 2 लाख 1 हजार 271 मतदारांची नोंदणी करण्यात आली.
समाविष्ट केलेले मतदार : प्रारुप मतदार यादीनुसार दि.6 ऑगस्ट पर्यंत 22 हजार 469 मतदाराचा समावेश करण्यात आला. तर अंतिम मतदार यादीनुसार दि.30 ऑगस्ट पर्यंत 19 हजार 691 मतदाराचा समावेश करण्यात आला.
कमी केलेले मतदार : प्रारुप मतदार यादीनुसार दि.6 ऑगस्ट पर्यंत 2 हजार 106 मतदार वगळन्यात आले आहेत तर दि.30 ऑगस्ट पर्यंत 2 हजार 199 मतदार वगळन्यात आले आहे.
80 वर्षावरील मतदारांची संख्या : प्रारुप मतदार यादीनुसार दि.6 ऑगस्ट पर्यंत 80 वर्षावरील 35 हजार 264 मतदार होते तर दि. 30 ऑगस्ट पर्यंत 80 वर्षावरील 35 हजार 120 मतदार आहेत.
जिल्ह्यातील 1 हजार 342 मतदान केंद्राकरीता नेमन्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे 130 पर्यंवेक्षक यांच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष शिबिराचे आयोजन करुन नवमतदार व 80 वर्षावरील मतदारांच्या घरी भेटी देण्यात आल्या. तसेच यासाठी विविध राजकीय पक्षानी 1 हजार 833 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणुक करुन सहकार्य केले. आगामी काळात निवडणुका लक्षात घेता गावागावांमध्ये मोबाईल डेमो व्हॅन व्दारे 1 हजार 342 मतदान केंद्रातील 936 मतदान केंद्र ठिकाणांपैकी 468 ठिकाणी जनजागृती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अंतिम मतदार यादीचे राजकिय पक्षाच्या प्रतिनिधींना वितरण
दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आज दि.30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यांदी प्रसिध्द करण्यात आली असून या अंतिम मतदार यादी मतदान केंद्रावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच सदर अंतिम मतदार यादीचे राजकिय पक्षाच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करुन बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात वितरण करण्यात आले.

Post Views: 273
Previous Post

वर्धा महसूल कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय कामबंद आंदोलन

Next Post

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याचे थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाणे 

Next Post
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याचे थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाणे 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याचे थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाणे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us