Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

माय मराठी झाली अभिजात भाषा; महिला मंडळ शाळेत निर्णयाचे स्वागत

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 4, 2024
in चोपडा, शैक्षणिक
0
माय मराठी झाली अभिजात भाषा; महिला मंडळ शाळेत निर्णयाचे स्वागत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 4 – ‘माझ्या मऱ्हाटीचे बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’, अशी थोरवी असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर करत सकल मराठी मनांना आनंद दिला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचे येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना माजी मुख्याध्यपक विलास पाटील व उपस्थित इतर मान्यवर

यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झालेले विविध स्तरावरील प्रयत्न व हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा गौरव कसा वाढेल याविषयी माहिती विद्यालयातील शिक्षक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी विद्यार्थ्यांना दिली. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माय मराठी महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी या निर्णयामुळे मराठी आणि इतर बोलीभाषा यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करता येतील असे सांगत मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला.
माय मराठी महाराष्ट्र संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पाटील (सेवा निवृत्त मुख्याध्यापक) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची थोरवी सांगत मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भरीव प्रयत्न करता येतील तसेच बोलीभाषांचे संशोधन करता येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना शर्करा युक्त गोळ्या (चॉकलेट) वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. आरंभी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी गौरव गीताचे सुरेल गायन केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी यांची उपस्थिती होती.


यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध सुविचारांचे तसेच अभिनंदनाच्या घोषणांचे फलक तयार केले होते. कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक विजय पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली तीन वर्षे सातत्याने राष्ट्रपतींना विनंती करणारी पत्रे लिहिली होती.

 

Post Views: 315
Previous Post

चोपड्यात बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपात अनियमितता

Next Post

चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ‘आनंदोत्सव कार्यक्रमाचे’ आयोजन

Next Post
चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ‘आनंदोत्सव कार्यक्रमाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल 'आनंदोत्सव कार्यक्रमाचे' आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us