Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ‘आनंदोत्सव कार्यक्रमाचे’ आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 9, 2024
in शिक्षण
0
चोपडा महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ‘आनंदोत्सव कार्यक्रमाचे’ आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी सौ.एम.टी.शिंदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील, एम.बी.पावरा, एस.जी. पाटील, बी.एच.देवरे, नितेश सोनवणे व शुभांगी पाटील आदि उपस्थित होते.यावेळी अभिजात मराठी भाषा समितीने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.एम.एल.भुसारे यांनी अभिजात मराठी भाषा समितीचे कार्य, संशोधन तसेच अभिजात मराठी भाषेसंदर्भातील निकष, ऐतिहासिक पुरावे, संविधानिक तरतुदी, अभिजात भाषेची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, ही मराठी भाषिकांच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठीच्या संशोधनावर भर दिला जाईल. मराठीच्या संशोधनासाठी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुदान प्राप्तीस वाव मिळेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषिकांनीही आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे’.यावेळी त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जा प्राप्ती संदर्भातील फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Post Views: 385
Previous Post

माय मराठी झाली अभिजात भाषा; महिला मंडळ शाळेत निर्णयाचे स्वागत

Next Post

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण : आ. डॉ. पंकज भोयर

Next Post
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण : आ. डॉ. पंकज भोयर

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण : आ. डॉ. पंकज भोयर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us