Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 26, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा, दि.26 – शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिक येथे आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वान्मथी सी. यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी 10.30 वाजता नवनियुक्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.

नूतन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचे चरखा देऊन स्वागत करतांना प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील त्या मूळ रहिवासी आहेत. वान्मथी सी. या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या बॅचच्या असून त्यांनी 152 वी रँक प्राप्त केली होती. आयएएस रँक मिळाल्यानंतर त्यांनी यापुर्वी नंदूरबार येथे 2018-2019 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणुन सेवा दिली. जुलै 2019 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर त्यांची बदली राज्य कर सहआयुक्त या पदावर करण्यात आली. राज्य शासनाने त्यांची वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणुन बदली केली असून आज त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.

प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी वान्मथी सी. यांचे चरखा देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, विश्वास सिरसाट, वंदना सवरंगपते, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपजिल्हाअधिकारी (निवडणूक) अनील गावीत, तहसिलदार संदीप पुंडेकर, समर्थ क्षिरसागर, मलीक विराणी, हरीष काळे, बबिता आळंदे, हंसा मोहणे उपस्थित होते.

Post Views: 376
Previous Post

प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us