टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 11 – दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून सावित्री असोसिएशन तर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यानिम्मित प्रतिमापूजन करून फुले दाम्पत्य यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा यावेळी उलगडा करण्यात आला व स्त्रीयांना मुख्य प्रवाहात आणणेकामी त्यांचे बहुमोल योगदान यावेळी विषद करण्यात आले.

याप्रसंगी सर्वप्रथम सावित्री असोसिएशनच्या अध्यक्षा अरुणा धोटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांनी कशाप्रकारे मोलाचे योगदान दिले असून फुले दाम्पत्यांचा थोडक्यात परिचय आपल्या भाषणातून करून दिला. सदर कार्यक्रम सावित्रीबाई असोसिएशनच्या मानस मंदिर, म्हाडा कॉलनी रोड येथील कार्यालयामध्ये पार पडला.

सदर कार्यक्रमाला कांताताई कालोरकर, मंगलाताई चिकटे, शुभांगी हिवसे, प्रज्ञाताई झाडें, मंदाताई जाधव, शारदाताई दाते, रमाताई शुक्ला, सुनीताताई टावरी, छायाताई भिसे, भारतीताई वानखेडे, कल्पना पटेल आदीसह इतर महिलावर्गाची उपस्थिती होती.








